Moscow Attack : तिथे कोण वाट बघत होतं? कॉन्सर्ट हॉल हल्ल्यावर पुतिन यांचा नेमका प्रश्न
ISIS ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अमेरिकेने सुद्धा याची पृष्टी केली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅनुएल मॅक्रॉन यांनी सांगितलं की, फ्रान्सकडे जी गोपनीय माहितीय आहे, त्यानुसार या हल्ल्यामागे इसिस आहे.
रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये मागच्या आठवड्यात एका कॉन्सर्ट हॉलवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामागे इस्लामिक कट्टरपंथी आहेत, असा रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दावा केला आहे. या हल्ल्यात 130 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. इस्लामिक कट्टरपंथीयांनी हा हल्ला केलाय, असं सरकारी अधिकाऱ्यांसोबत बैठकीत पुतिन म्हणाले. चारही हल्लेखोर युक्रेनला पळण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना अटक करण्यात आली, असं पुतिन म्हणाले.
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी पुन्हा एकदा इस्लामिक स्टेटचा उल्लेख करण टाळलं. गुन्हा केल्यानंतर दहशतवाद्यांना युक्रेनला पळण्याचा प्रयत्न का केला? तिथे त्यांची कोण वाट बघत होतं? हे जाणून घेण गरजेच आहे, असं पुतिन यांनी म्हटलं आहे. ISIS ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अमेरिकेने सुद्धा याची पृष्टी केली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅनुएल मॅक्रॉन यांनी सांगितलं की, फ्रान्सकडे जी गोपनीय माहितीय आहे, त्यानुसार या हल्ल्यामागे इसिस आहे.
क्रेमलिनचे प्रवक्ते काय म्हणाले?
सोमवारी क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव यांनी कोणालाही जबाबदार ठरवायला नकार दिला होता. रशियन तपास यंत्रणांच्या रिपोर्टची प्रतिक्षा करायला हवी असं सांगितल होतं. अमेरिकेने सात मार्चलाच रशियाला संभाव्य हल्ल्याची आगाऊ कल्पना दिली होती, या अमेरिकेच्या दाव्यावर सुद्धा टिप्पणी करण टाळलं. पेसकोव म्हणाले की, अशी माहिती ही गोपनीय असते.