Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुस्लीम देश सौदी अरेबियाचा आधीच अडचणीत असलेल्या पाकिस्तानला मोठा झटका

पाकिस्तान आधीच अडचणीत सापडला आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था डगमळली आहे. त्यामुळे महागाई वाढली आहे. पाकिस्तान कर्ज घेऊन अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. इतर देशांकडून पाकिस्तानला मदतीची अपेक्षा आहे.

मुस्लीम देश सौदी अरेबियाचा आधीच अडचणीत असलेल्या पाकिस्तानला मोठा झटका
Follow us
| Updated on: May 11, 2024 | 8:02 PM

सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी पाकिस्तान भेट अज्ञात कारणांमुळे पुढे ढकलली आहे. शनिवारी याबाबत माहिती देण्यात आली. ‘जियो न्यूज’च्या वृत्तानुसार, मोहम्मद बिन सलमान दोन दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर येणार होते. 19 मे रोजी त्यांचा हा नियोजित दौरा होता. पण आता त्यांनी हा दौरा पुढे ढकलल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

सौदी अरेबियाच्या क्राउन प्रिन्सच्या यांच्या पाकिस्ताना भेटीवर भाष्य करताना, परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी शुक्रवारी स्पष्ट केले की इस्लामाबाद आणि रियाध यांच्यातील कार्यक्रम निश्चित होताच त्याचा तपशील सार्वजनिक केला जाईल. पाकिस्तानची जनता सौदी अरेबियाच्या नेत्याची आतुरतेने वाट पाहत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान शरीफ यांचा सौदी दौरा

मार्चमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर आता पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातील संबंध आणखी दृढ करण्यासाठी तसेच राजनैतिक आणि व्यापार आणखी वाढवण्यासाठी चर्चा होणार होती. पण सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिन्सची भेट आता लांबणीवर गेली आहे. पाकिस्तानात रोखीचा तुटवडा आहे. पाकिस्तानसाठी त्यांचा दौरा खूप महत्त्वाचा आहे.

पाकिस्तानला गुंतवणुकीची आशा आहे

पाकिस्तानला सौदी अरेबियाकडून मोठ्या गुंतवणुकीची अपेक्षा आहे. पाच वर्षांतील मोहम्मद बिन सलमान यांचा हा पहिलाच पाकिस्तान दौरा होता. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजवटीत फेब्रुवारी २०१९ मध्ये ते पाकिस्तानला आले होते. ते 2022 मध्ये पाकिस्तानला भेट देणार होते, परंतु शेवटच्या क्षणी हा दौरा रद्द करण्यात आला होता. पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये मजबूत व्यापारी, संरक्षण आणि सांस्कृतिक संबंध आहेत. सौदी अरेबियामध्ये जवळपास 27 लाख पाकिस्तानी प्रवासी राहतात.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.