म्यानमारमध्ये लष्कराचा उठाव, सत्तापालट; वर्षभरासाठी आणीबाणी

म्यानमारमध्ये लष्कराने उठाव केला आहे. लष्कराने नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी पार्टीच्या सर्वोच्च नेत्या आंग आन सू की यांना अटक केली असून सत्तापालट केला आहे. (Myanmar's Suu Kyi Detained In Military Coup, 1-Year Emergency Declared)

म्यानमारमध्ये लष्कराचा उठाव, सत्तापालट; वर्षभरासाठी आणीबाणी
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 9:45 AM

नैप्यीडॉ: म्यानमारमध्ये लष्कराने उठाव केला आहे. लष्कराने नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी पार्टीच्या सर्वोच्च नेत्या आंग आन सू की यांना अटक केली असून सत्तापालट केला आहे. आंग सान सू की यांना ताब्यात घेतल्यानंतर देशात एक वर्षासाठी आणीबाणी लागू करण्यात आली आहे. तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. म्यानमारच्या सत्तेची सूत्रे आता वर्षभरासाठी लष्कराच्या ताब्यात राहणार आहे. (Myanmar’s Suu Kyi Detained In Military Coup, 1-Year Emergency Declared)

नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसीच्या प्रवक्त्यानेही देशात लष्करी उठाव झाल्याच्या वृत्ताला पृष्टी दिली आहे. आज पहाटेच अनेक नेत्यांना अटक करण्यात आली आहे. सू की यांनाही अटक करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून लष्कर आणि सरकार दरम्यान तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे म्यानमारमध्ये लष्करी उठाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. शनिवारीच देशात सत्तापालट करण्याचं वृत्त म्यानमारच्या लष्कराने फेटाळून लावली होती. मात्र, प्रत्यक्षात लष्कराने उठाव केल्याने म्यानमारच्या जनतेलाही धक्का बसला आहे.

निवडणुकीत गैरप्रकार

म्यानमारमध्ये झालेल्या निवडणुकीत 8 नोव्हेंबर रोजी सत्ताधारी नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसीने 476 पैकी 396 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे आंग सान सू ची की यांना पाच वर्षासाठी सरकार बनविण्याची संधी देण्यात आली होती. तर, लष्कराचं समर्थन असलेल्या यूनियन सॉलिडेरिटी अँड डेव्हल्पमेंट पार्टीला केवळ 33 जागा जिंकता आल्या होत्या. लष्कराने या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. तसेच या निवडणुकीच्या निकालांचा फेर आढावा घेण्याची विनंतीही लष्कराने निवडणूक आयोगाला केली होती.

लष्करी राजवट नवी नाही

म्यानमारला लष्करी राजवट नवीन नाही. यापूर्वी 1962 पासून ते 2011 पर्यंत म्यानमारमध्ये मिलिट्री राज राहिलेलं आहे. 2010मध्ये म्यानमारमध्ये सार्वजनिक निवडणुका झाल्या. 2011मध्ये म्यानमारमध्ये जनतेचं सरकार आलं. त्यामुळे निवडून आलेल्या प्रतिनिधींना सत्तेत जाण्याची संधी मिळाली होती. (Myanmar’s Suu Kyi Detained In Military Coup, 1-Year Emergency Declared)

संबंधित बातम्या:

मुलींना टाईट जीन्स, हायहिल्स घालण्यास बंदी; पाकिस्तानमधील विद्यापीठाचा गजब कारभार

Special Story : रशियावर मागील 20 वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व, व्लादिमीर पुतिन यांच्या सत्तेचं रहस्य काय?

‘2021 हे जागतिक आरोग्य स्थानिक स्तरावर आणणारे वर्ष’; बिल आणि मेलिंडा गेट्स यांचे वार्षिक पत्र प्रसिद्ध

(Myanmar’s Suu Kyi Detained In Military Coup, 1-Year Emergency Declared)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.