इस्त्रायलमध्ये नव्या सरकारला मंजुरी, नेत्यान्याहूचं 12 वर्षाच्या राजवटीची अखेर

इस्राईलच्या संसदेने नव्या सरकारच्या स्थापनेसाठी मंजूरी दिलीय. नफ्ताली बेनेट यांनी 60 विरुद्ध 59 मतांनी इस्राईलच्या संसदेत विश्वासमत ठराव जिंकला.

इस्त्रायलमध्ये नव्या सरकारला मंजुरी, नेत्यान्याहूचं 12 वर्षाच्या राजवटीची अखेर
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 1:53 AM

जेरुसलेम : इस्राईलच्या संसदेने नव्या सरकारच्या स्थापनेसाठी मंजूरी दिलीय. नफ्ताली बेनेट यांनी 60 विरुद्ध 59 मतांनी इस्राईलच्या संसदेत विश्वासमत ठराव जिंकला. यासह इस्राईलच्या सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेल्या बेंजमिन नेतन्याहू यांची सत्ता संपुष्टात आलीय. बेनेट यांनी बहुमत सिद्ध करत एका दशकानंतर बेंजमिन यांना सत्तेवरुन खाली खेचत वेगळ्या पक्षाच्या शपथविधीचा मार्ग मोकळा केलाय. यामुळे इस्राईलच्या राजकारणातील बेंजमिन यांच्या पकडीला सुरूंग लागलाय (Naftali Bennett win trust vote in parliament to form government in Israel).

इस्राईलचे माजी पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू आंतरराष्ट्रीय राजकारणातही चांगलेच चर्चित नेते ठरले. ते आपल्या कार्यकाळात जागतिक राजकारणात चांगलेच सक्रीय असलेले दिसले. इस्राईलचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदाचा मान बेंजमिन यांनाच जातो. नव्या सरकारच्या स्थापनेनंतर इतके वर्षे सत्तेत राहिलेल्या नेतन्याहू आणि त्यांचा लिकुड पक्षाला आता विरोधी बाकावर बसावं लागणार आहे. बेंजमिन हेच लिकुड पक्षाचे विधीमंडळ नेते आणि संसदेचे विरोधी पक्षनेते असतील.

लवकरच सरकार पाडणार : नेतन्याहू

बेंजमिन नेतन्याहू यांना पंतप्रधान पदाच्या खुर्चीवरुन खाली येणं आवडलेलं दिसत नाही. त्यामुळेच बहुमत सिद्ध झाल्यानंतर सरकार अजून स्थापनही झालेलं नाही तेच नेतन्याहू यांनी सरकार पाडणार असल्याचा इशारा द्यायला सुरुवात केली. नेतन्याहू यांनी नव्या सरकारवर फसवणूक करुन युती केल्याचा आरोप केलाय.

बेंजमिन नेतन्याहू यांच्यावर गंभीर आरोप

नेतन्याहू सत्ता गेल्यानंतर नव्या सरकारवर आरोप करत असले तरी त्यांच्या स्वतःवरच अनेक गंभीर आरोप झालेले आहेत. या प्रकरणांचा तपास सुरू असून काही प्रकरणात न्यायालयात खटलेही सुरू आहेत. नेतन्याहू यांच्यावर लाचखोरी, फसवणुकीसह विश्वासघातासारखे अनेक आरोप आहेत. या प्रकरणी त्यांच्याविरोधात खटलेही सुरू आहेत. मात्र, नेतन्याहू यांनी त्यांच्यावरील आरोप खोटे असल्याचा दावा केलाय.

इराणबाबत नव्या पंतप्रधानांचीही कठोर भूमिका

बहुमताआधी केलेल्या भाषणात इस्राईलचे होऊ घातलेले पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी कठोर भूमिका घेतली. ते म्हणाले, “इराणसोबत आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र सामंजस्य करार करणं मोठी चूक आहे. इस्राईल इराणविरोधात कारवाई करण्यास सक्षम आहे. इस्राईल इराणला अण्वस्त्र बाळगण्यास परवानगी देणार नाही. आम्ही या कराराचा भाग नसू. तसेच त्यावर कारवाई करण्याचं आमचं स्वातंत्र्य आमच्याकडे असेल.

हेही वाचा :

नेतन्याहू यांची इस्त्राईलवरील सत्ता संपुष्टात, 6 खासदार असलेले नवे पंतप्रधान कोण? भारतासह जगावर परिणाम होणार

वेळ आली तर अमेरिकेशीही संघर्ष करु, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंचं मोठं विधान

Photos : Israel-Hamas Ceasefire: 240 लोकांचा मृत्यू, शेकडो इमारती उद्ध्वस्त, युद्धविरामानंतर नागरिक गाझाच्या रस्त्यांवर

व्हिडीओ पाहा :

Naftali Bennett win trust vote in parliament to form government in Israel

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.