पाकिस्तानात मोदी यांच्या एका व्हिडिओची धूम, काय म्हटले होते ‘त्या’ व्हिडिओत मोदींनी
इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षातील नेते आजम खान यांनी मोदी यांचा जुना व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात मोदी यांनी पाकिस्तानला भीक मागण्यास मजबूर करणार असल्याचे वक्तव्य केले आहे.
लाहोर : पाकिस्तान (pakistan)प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. आर्थिक संकटापाठोपाठ पाकिस्तानमधील परकीय चलनाचा साठा संपत आला. पाकिस्तानच्या परदेशी चलनाचा साठा गेल्या महिन्यात 294 मिलियन डॉलरने कमी होऊन 5.8 अब्ज डॉलरवर आला आहे. पाकिस्तान (pakistan)व्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या गिलगिट-बाल्टिस्थानमध्ये पाकिस्तानच्या विरोधात आंदोलन (protest in pakistan)पेटलं आहे. या भागातील जनतेला भारतात समावेश हवा आहे. गिलगिट बाल्टिस्थामध्ये जनतेला भारतातील लडाखमध्ये विलिनीकरण हवे आहे. पाकिस्तानात (pakistan) वर्षभरात कांद्याचे दर ५०० टक्के वाढले आहे. पाकिस्तानात कांद्याचे दर २२० रुपयांवर आहे. आटा १६०, साखर १०० रुपये किलो मिळत आहे. बासमती तांदूळ ३६ रुपयांवर २२० रुपयांवर जाऊन पोहचला आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खराब झाल्यामुळे पाकिस्तानी रुपयांत प्रचंड घसरण झाली आहे. पाकिस्तानची अशी परिस्थिती असताना इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षातील नेते आजम खान यांनी मोदी यांचा जुना व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात मोदी यांनी पाकिस्तानला भीक मागण्यास मजबूर करणार असल्याचे वक्तव्य केले आहे.
رجیم چینج کے سہولت کارو۔ سنو انڈیا کا مودی پاکستان کے بارے میں کیا کہہ رہا ہے؟ اگر غیرت نام کی کوئ چیز تم میں نہیں تو شرم تو کرو؟ پاکستان کے لوگو: اس لئے اپنے اس ملک کو بچانے کا واحد راستہ عمران خان کے سنگ حقیقی آزادی ہے. pic.twitter.com/yvRIsoTKPf
हे सुद्धा वाचा— Senator Azam Khan Swati (@AzamKhanSwatiPk) January 11, 2023
खासदार आजम खान यांनी व्हिडिओ ट्विट करताना म्हटले आहे की, पाहा, भारताचे पंतप्रधान पाकिस्तानसंदर्भात काय म्हणत आहे. जर तुमच्यात थोडी लाज बाकी असेल तर इम्रान खान यांना सत्ता द्या. आजम खान यांनी ट्विट केलेला मोदी यांचा व्हिडिओ २०१९ मधील आहे. त्यावेळी इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पीटीआयची सत्ता होती.
पाकिस्तान दिवाळखोर जाहीर होण्याच्या उंबरठ्यावर आहे. यावेळी पंतप्रधान शहबाज शरीफ दिवाळखोरी जाहीर होऊ नये म्हणून खूप प्रयत्न करत आहे. जिनेव्हात शरीफ कर्ज मिळवण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी त्यांना १० अब्ज डॉलरचे कर्ज मिळवण्यात यश आले.
का निर्माण झाली अशी परिस्थिती :
जर पाकिस्तानने भारताशी व्यापारी संबंध तोडले नसते किंवा काही काळानंतर त्यात सुधारणा केली असती तर पाकिस्तानची परिस्थिती वेगळी असती. भारतातून साखर आयात केल्यानंतर त्यांना आयात खर्च खूपच कमी झाला असता.कारण दोन्ही देशातून रस्तेमार्गाने साखरेची वाहतूक कमी खर्चात झाली असती. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानच्या साखर उत्पादन क्षमतेत मोठी घट झाली आहे. साखरेसाठी ते आयातीवर अवलंबून झाले आहे, मात्र पाकिस्तानी रुपयाच्या कमजोरीमुळे साखरेची पुरेशा प्रमाणात आयात होत नाही.पाकिस्तान सध्या साखर पुरवठ्यासाठी UAE, ब्राझील, इजिप्त आणि अल्जेरिया या देशांवर अवलंबून आहे. पाकिस्तान-भारत संबंध चांगले असते तर साखर खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागले नसते. कारण भारत सवलतीच्या दराने साखर आयात करत आहे.