Sunita Williams : टेन्शन वाढवणारी बातमी, सुनीता विलियम्स यांचं पृथ्वीवर परतण्याच मिशन संकटात

Sunita Williams : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलियम्स मागच्या 182 दिवसापासून अवकाशात अडकून पडल्या आहेत. आधी सुनीता विलियम्स आणि बूच विल्मोर हे फेब्रुवारीपर्यंत पृथ्वीवर परततील असं बोललं जात होतं. पण आता पुन्हा तारीख बदलली आहे. नेमकी समस्या काय आहे? इतका विलंब का होतोय?

Sunita Williams : टेन्शन वाढवणारी बातमी, सुनीता विलियम्स यांचं पृथ्वीवर परतण्याच मिशन संकटात
sunita-williams
Follow us
| Updated on: Dec 18, 2024 | 1:06 PM

अवकाशातून सुनीता विलियम्सच्या पृथ्वीवर परतण्याबाबत एक वाईट बातमी आहे. अवकाशातून सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणण्यात अजून विलंब होईल. अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाने ही घोषणा केली आहे. मार्च 2025 आधी सुनीता आणि बूच पृथ्वीवर परतणार नाहीत असं नासाकडून सांगण्यात आलय. दोन्ही अवकाशवीर मागच्या सहा महिन्यापासून अवकाशात अडकून पडले आहेत. सुनीता विलियम्स 7 ते 10 दिवसांच्या मिशनसाठी अवकाशात गेली होती. पण मागच्या 182 दिवसापासून ती तिथेच अडकून पडली आहे. अवकाशात सुनीता खूप अशक्त झाली आहे. सुनीता आणि बूचसमोर अन्नाच संकट निर्माण झालय. सहा महिन्यापासून दोघे अवकाशात आहेत.

याआधी अशी बातमी होती की, सुनीता आणि बुच पुढच्यावर्षी फेब्रुवारी महिन्यापर्यंत पृथ्वीवर येतील. पण स्टारलायर स्पेसक्राफ्टमध्ये बिघाड झाल्याने ते तिथेच अडकून पडले. आता सुनीता आणि बुचच्या परतीची तारीख बदलली आहे. आता म्हटलं जातय की, मार्च 2025 पर्यंत दोघे पृथ्वीवर परत येतील. सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोरला सुरक्षित पृथ्वीवर आणण्यासाठी नासाने त्यांचा क्रू-9 मिशनमध्ये समावेश केला आहे. सुनीता आणि बूचसह क्रू-9 चे चार अवकाशवीर ड्रॅग्न स्पेसक्राफ्टने पृथ्वीवर परततील.

नासा काय मानायला तयार नाही?

अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासा दोन्ही अंतराळवीर तिथे अडकलेत हे मानायला तयार नाही. नासानुसार दोन्ही अंतराळवीर याआधी सुद्धा तिथे राहिले आहेत. म्हणून कमी काळात दोघे चालक दलाचे सदस्य बनले. सुनीता विलियम्स यांना नासाने मोठी जबाबदारी दिली होती. नासाने त्यांना स्पेस स्टेशनच कमांडर बनवलं. सुनीताने सप्टेंबरपासून स्टेशन कमांडरची जबाबदारी संभाळली. त्याआधी ही जबाबदारी स्पेस स्टेशनवर असलेले रशियन अंतराळवीर संभाळत होते. पण 23 सप्टेंबरला ते परतण्याआधी ही जबाबदारी सुनीता विलियम्स यांच्याकडे देण्यात आली.

“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.