मुंबई-चेन्नईला बुडण्यापासून वाचवणार NASA च Ice Robot प्रोजेक्ट, काय आहे हा प्रकल्प?
वैज्ञानिकांनी अनेकदा सांगितलय की, 2050 पर्यंत जगातील अनेक देश, बेटं आणि भारतातील कमीत कमी किनारपट्टीवरील 13 शहर समुद्रात बुडून जातील. कमीत कमी एक मोठा हिस्सा बुडून जाईल. म्हणूनच नासाचा एक स्पेशल प्रोजेक्ट आहे.
फक्त 16 वर्ष. मुंबईचा 13 टक्के 830 वर्ग किलोमीटर भाग समुद्रात बुडून जाईल. 2150 पर्यंत मुंबई संपलेली असेल. प्रश्न फक्त समुद्रकिनारी वसलेल्या मुंबईसारख्या शहरांचा नाहीय. मुद्दा हा आहे की, ज्या समुद्राच्या मदतीने व्यवसाय चालतो. तोच समुद्र गिळून टाकणार. प्राचीन द्वारकेप्रमाणे हे शहर पाण्याखाली असणार. मुंबईला पाहण्यासाठी पारदर्शक सबमरीन किंवा स्कूबा डायविंग करावं लागेल.
समुद्राचा वाढता जलस्तर मोजण्यासाठी नासाच्या शास्त्रज्ञानी खास रोबोट्स तयार केलेत. हे रोबोट्स पाण्याखाली तैनात केले जातायत. नासाच्या जेट प्रोपल्शन लेबोरेटरीने नवीन प्रोजेक्ट सुरु केलाय. याच नाव आहे, IceNode. या मिशनमध्ये नासाचे वैज्ञानिक अंटार्कटिकामध्ये समुद्राच्या आत अंडरवॉटर रोबोट्स सोडत आहेत. हे रोबोट्स समुद्राच्या आतून अभ्यास करतील.
तर सगळ्या जगाला धक्का बसेल
यावर्षी मार्च महिन्यात नासाच्या वैज्ञानिकांनी एक सिलेंडरसारखा रोबोट अलास्काच्या ब्यूफोर्ट समुद्रात 100 फूट खाली तैनात केला. असेच रोबोट्स अंटार्कटिकात तैनात करण्याची तयारी आहे. हे सर्व रोबोट्स बर्फाच वितळणं आणि समुद्राचा जलस्तर वाढण्याचा अभ्यास करतील. अंटार्कटिकात बिघाड झाला, तर सगळ्या जगाला धक्का बसेल. तिथे होणाऱ्या कुठल्याही हवामान बदलाचा जगावर परिणाम होतो. म्हणून तिथे अशी यंत्र लावण्याची गरज आहे, जे भविष्यातील संकटांची माहिती देतील.
जगाच्या नकाशावरुन ही बेटं गायब होतील
वैज्ञानिकांच्या अंदाजानुसार संपूर्ण अंटार्कटिकातील सर्व बर्फ वितळला, तर जगात समुद्राची पाणी पातळी 200 फुटांनी वाढेल. यामुळे भारतात किनारपट्टीवरील राज्यांचा मोठा भाग बुडून जाईल. जगाच्या नकाशावरुन ही बेटं गायब होतील. कदाचित समुद्र बघण्यासाठी तुम्हाला चेन्नईला जावं लागणार नाही, बंगळुरुतच तुम्ही पाहू शकाल. कारण ज्या हिशोबाने गर्मी, ग्लोबल वॉर्मिंग वाढतय ग्लेशियर आणि अंटार्कटिकामध्ये बर्फ वेगाने वितळतोय.