Sri Lanka झाली आता नेपाळवर आर्थिक अस्थिरतेचे ढग! सायकल ते तांदूळ आयातीवर निर्बंध

महागड्या वस्तूंच्या आयातीवर (IMPORT RESTRICTION) निर्बंध लादण्याचे निर्देश नेपाळ राष्ट्र बँकेने अर्थ मंत्रालयाला दिले आहेत. बुडत्या अर्थव्यवस्थेला उर्जिातवस्था देण्यासाठी एनआरबी आगामी काळात आणखी पावलं उचलण्याची शक्यता आहे.

Sri Lanka झाली आता नेपाळवर आर्थिक अस्थिरतेचे ढग! सायकल ते तांदूळ आयातीवर निर्बंध
..आणखी एक देश संकटात?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 10:02 PM

नवी दिल्ली : भारताचे शेजारी राष्ट्र सध्या आर्थिक गर्तेत सापडले आहेत. श्रीलंकेनंतर नेपाळची अर्थव्यवस्था (NEPAL ECONOMY) संकटात सापडली आहे. श्रीलंकेत एक कप चहासाठी श्रीलंकन नागरिकांना शंभर रुपये द्यावे लागत आहे. नेपाळची आर्थिक स्थिती डगमगली असून नेपाळ सरकारने महत्वाचे धोरणात्मक निर्णय जारी केले आहेत. महागड्या वस्तूंच्या आयातीवर नेपाळ सरकारने बंदी घातली आहेत. नागरिकांना अनावश्यक बाबींसाठी कर्ज मंजूर करण्याचे निर्देश श्रीलंकन बँकांना देण्यात आले आहे. नेपाळची मध्यवर्ती बँक नेपाळ राष्ट्र बँकेनं (NEPAL RASHTRA BANK) कठोर निर्बंध हाती घेण्यास सुरुवात केली आहे. महागड्या वस्तूंच्या आयातीवर (IMPORT RESTRICTION) निर्बंध लादण्याचे निर्देश नेपाळ राष्ट्र बँकेने अर्थ मंत्रालयाला दिले आहेत. बुडत्या अर्थव्यवस्थेला उर्जिातवस्था देण्यासाठी एनआरबी आगामी काळात आणखी पावलं उचलण्याची शक्यता आहे.

अनावश्यक कर्ज टाळा-

नेपाळ राष्ट्र बँकेने केंद्रीय अर्थ मंत्रालयाला पत्र लिहिलं आहे. पेट्रोलियम उत्पादनांच्या आयात नियंत्रण करण्याचे आदेश जारी दिले आहेत. अनावश्यक कर्ज देण्यावरही बँकेने कठोर सूचना केल्या आहेत. 27 व्यापारी बँकांसोबतच्या बैठकीत वाहन तसेच अनेक अनावश्यक कारणांसाठी कर्ज देताना विचार करावा असं एनआरबीनं म्हटलं आहे. नेपाळ सरकार पेट्रोल आयात करण्यासाठी भारताला दर महिन्याला 24-29 कोटी रुपये देत असतो.

नेपाळच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत दिवसागणिक घट होत आहे. त्यामुळे महागड्या वस्तूंच्या आयातीवर निर्बंध घालण्याच्या तयारीत नेपाळ सरकार आहे. मात्र, नेपाळ सरकारच्या प्रतिनिधींनी आगामी पाच ते सहा महि्न्यांच्या आयातीसाठी पुरेशा चलनसाठा असल्याचं म्हटलं आहे.

आयातीवर रेड सिग्नल

सायकल, डिझाईन वाहन, मोपेड आणि अ्त्यावश्यक वाहन, तांदूळ, कापडं, मशीनरी आणि स्पेअर पार्ट्स, सोने, रेडिमेड कपडे, सिमेंट, फर्निचर व संबंधित वस्तूच्या आयातीवर निर्बंध लादण्यात आले आहे.

पर्यटनावर अर्थव्यवस्था:

नेपाळ हा एक दक्षिण आशियातील महत्वाचा देश आहे. नेपाळचं क्षेत्रफळ एक लाख 47 हजार 181 वर्ग किलोमीटर आहे. नेपाळ हे जगातील तीन हिंदूबहुल राष्ट्रांपैकी एक मानलं जातं. नेपाळमधील 90% लोक शेती आणि पर्यटन उद्योगावर आपली गुजराण करतात. नेपाळच्या गंगाजळीत परकीय चलनाची भर यामुळेच पडते. नेपाळ नागरिकांचे दरडोई उत्पन्न 210 यु.एस .डॉलर म्हणजे 10500 रुपये आहे.

अर्थव्यवस्थेला कोविडचा फटका:

नेपाळची अर्थव्यवस्था पर्यटनावर आधारित आहे. कोविड निर्बंधामुळं जगभरातील पर्यटकांचा ओघ मंदावला. त्यामुळे नेपाळच्या गंगाजळीला मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यामुळे लाखो नेपाळींवर बेरोजगारीचं कुर्हाड कोसळली होती. त्यामुळे नेपाळच्या आर्थिक वाताहातील कोविड फटका जबाबदार असल्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी वर्तविला आहे.

इतर बातम्या :

Pakistan Political Crisis : हेलिकॉप्टर आलं आणि इम्रान खान यांचा गेम पलटला, बाजवांचा बळी देण्याचा प्रयत्न हुकला

Special : सावकार मालामाल आणि थकबाकीदार बेहाल! चीनकडून लोन घेतल्यामुळे श्रीलंकेचं वाटोळं झालं?

भारतात Hijab Controversy; अल कायदाचा क्रूर दहशतवादी बिळातून बाहेर, म्हणाला…

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.