पाकिस्तान, चीननंतर भारताच्या या शेजारी देशाची कुरघोडी, नोटांवर भारताचा भूभाग आपला दाखवणार

2020 पासून नेपाळने त्यांचा नकाशा बदलवला आहे. दोन्ही देशातील वाद दीर्घकाळापासून सुरु आहे. भारताने नकाशातील या बदलांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. भौगोलिकदृष्ट्या नेपाळ आणि भारत यांच्या सीमा भारतातील पाच राज्यांसोबत आहे.

पाकिस्तान, चीननंतर भारताच्या या शेजारी देशाची कुरघोडी, नोटांवर भारताचा भूभाग आपला दाखवणार
नेपाळ नोट
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 1:18 PM

Nepal Currency: पाकिस्तान आणि चीनकडून भारतासंदर्भात नेहमी कुरघोडी होत असते. हे देश भारताचा भूभाग आपला दाखवत असतात. त्याला भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाते. परंतु आता आणखी एका देशाने भारताचा भूभाग आपला दाखवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. नेपाळने हा प्रयत्न केल्यानंतर नवीन वाद निर्माण होणार आहे. नेपाळमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे सरकार आल्यापासून हे सरकार सातत्याने भारतविरोधी भूमिका घेत आहेत. या सरकारने चीनची जवळीक निर्माण केली आहे.

भारताकडून तीव्र विरोध

नेपाळ सेंट्रल बँक, नेपाळ राष्ट्र बँकने (एनआरबी) चीनी कंपनीला नवीन 100 रुपयांच्या नोटा छापण्याचे काम दिले आहे. या नोटावर नवीन नकाशा दिला आहे. त्या नकाशामध्ये नेपाळमधील लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी हा वादग्रस्त भाग आपला असल्याचा दावा नेपाळने केला आहे. नेपाळ कॅबिनेटने हा नवीन नकाशा मंजूर केला आहे. नेपाळने 18 जून 2020 रोजी राज्यघटनेत दुरुस्ती करून या भागांचा राजकीय नकाशामध्ये समावेश केला होता. त्यावेळी भारताने या कारवाईला तीव्र विरोध दर्शवला होता. लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा हे भारताचे अविभाज्य भाग असल्याचे भारताने वारंवार स्पष्ट केले आहे.

नेपाळने त्यांच्या देशातील नोटा छापण्याचे कंत्राट चायना बँक नोट प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशनला दिले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, या करारानुसार चीनी फर्मला 100 रुपयांच्या नोटांच्या 300 दशलक्ष युनिट्सची छपाई करण्याचे काम सोपवले आहे. त्याचा अंदाजे उत्पादन खर्च अंदाजे 9 मिलियन दशलक्ष अमेरिकन डॉलर आहे.

हे सुद्धा वाचा

2020 पासून दोन्ही देशांत वाद

2020 पासून नेपाळने त्यांचा नकाशा बदलवला आहे. दोन्ही देशातील वाद दीर्घकाळापासून सुरु आहे. भारताने नकाशातील या बदलांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. भौगोलिकदृष्ट्या नेपाळ आणि भारत यांच्या सीमा भारतातील पाच राज्यांसोबत आहे. यामध्ये सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचा समावेश आहे. एकूण 1,850 किमी सीमारेषा दोन्ही देशांच्या लागून आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.