AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nepal Plane Crash: आतापर्यंत 68 मृतदेह बाहेर काढण्यात यश, खराब हवामान नाही तर ‘हे’ कारण ठरले अपघाताला कारणीभूत

पायलटने विमानाला शहरात अपघात होण्यापासून वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जेणेकरून नुकसान कमी होईल. हे विमान नेपाळची राजधानी काठमांडू येथून पोखराच्या दिशेने जात होते.

Nepal Plane Crash: आतापर्यंत 68 मृतदेह बाहेर काढण्यात यश, खराब हवामान नाही तर 'हे' कारण ठरले अपघाताला कारणीभूत
नेपाळ विमान दुर्घटनाImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 15, 2023 | 5:12 PM

पोखरा, रविवारी नेपाळमधील पोखरा येथे यति एअरलाईन्सचे विमान कोसळले (Nepal Plane Crash). ताज्या माहितीनुसार, या अपघातानंतर आतापर्यंत 68 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पोखरा अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या अपघातात कोणीही वाचण्याची शक्यता नाही. पायलटने विमानाला शहरात अपघात होण्यापासून वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जेणेकरून नुकसान कमी होईल. हे विमान नेपाळची राजधानी काठमांडू येथून पोखराच्या दिशेने जात होते.  या विमानात 68 प्रवाशांसह एकूण 72 जण प्रवास करत होते. यति एअरलाइन्सचे एटीआर-72 विमान पोखरा विमानतळावर पोहोचण्याच्या 10 सेकंद आधी हा अपघात झाला. विशेष म्हणजे नेपाळच्या या पोखरा विमानतळाचे उद्घाटन अवघ्या 14 दिवसांपूर्वीच झाले होते. हा अपघात दिवसा 11.10 वाजता झाला. हे विमान पोखरा खोऱ्यातील सेती नदीच्या घाटात पडले.

हवामानामुळे नाही तर तांत्रिक बिघाडामुळे झाला अपघात

विमान दुर्घटनेचे कारण खराब हवामान नसून तांत्रिक बिघाड असल्याचे नेपाळच्या विमानतळ प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे. विमानाच्या पायलटने लँडिंगसाठी एटीसीकडून परवानगी घेतल्याचेही विमानतळ प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे. पोखरा एटीसीलाही लँडिंगसाठी ओके सांगण्यात आले. नागरी उड्डाण प्राधिकरणाचे म्हणणे आहे की, लँडिंगच्या आधी विमानात ज्वाळा दिसत होत्या, त्यामुळे खराब हवामानामुळे हा अपघात झाला असे म्हणता येणार नाही.

पंतप्रधान प्रचंड यांनी बोलावली तातडीची बैठक

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान प्रचंड यांनी सर्व सरकारी यंत्रणांना प्रभावी बचाव कार्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेबाबत त्यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठकही बोलावली होती. पंतप्रधान प्रचंड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तातडीच्या बैठकीत सरकारचे कॅबिनेट मंत्री उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

पंतप्रधान प्रचंड यांनी दौरा रद्द केला

पोखरा विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड आणि गृहमंत्री रबी लामिछाने आज पोखराला भेट देणार होते. पण काही वेळातच नेपाळ सचिवालयाकडून सांगण्यात आले की, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल आणि गृहमंत्री रबी लामिछाने यांचा पोखरा दौरा रद्द करण्यात आला आहे.

चीनच्या मदतीने बांधण्यात आला आहे पोखरा विमानतळ

मीडिया रिपोर्ट्सनुसार पोखरा विमानतळ चीनच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. त्याच्या बांधकामासाठी चीनच्या एक्झिम बँकेने नेपाळला कर्ज दिले होते. 1 जानेवारी 2023 रोजी नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. याशिवाय आणखी एक माहिती अशी की, ज्या विमानाचा अपघात झाला त्याच विमानाचे डेमो फ्लाइट उद्घाटनाच्या दिवशी करण्यात आले होते. नागरी विमान वाहतूक प्राधिकरण आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे.

 पाच भारतीयांचाही समावेश

या विमानात 5 भारतीय नागरिकांसह 14 परदेशी प्रवासी होते. नेपाळ आर्मी, सशस्त्र पोलीस, नेपाळ पोलीस तसेच स्थानिक नागरिक बचाव कार्यात गुंतले आहेत. बचाव मोहिमेदरम्यान आतापर्यंत 64 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?.
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल.
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी.
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त.
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती.
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री.
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा.