Nepal plane Crash: किती वर्ष जुने होते नेपाळमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेले विमान? पोखरा अपघाताचे पाच महत्वाचे मुद्दे

परदेशी नागरिकांमध्ये पाच भारतीय, चार रशियन, दोन दक्षिण कोरियाचे आणि प्रत्येकी एक आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना आणि फ्रान्सचा समावेश आहे.

Nepal plane Crash: किती वर्ष जुने होते नेपाळमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेले विमान? पोखरा अपघाताचे पाच महत्वाचे मुद्दे
पोखरा विमान दुर्घटनेतले विमानImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 15, 2023 | 6:26 PM

पोखरा, नेपाळमधील पोखरा येथे आज सकाळी कोसळलेले यती एअरलाइन्सचे विमान 15 वर्षे जुने होते. नेपाळमधील जवळपास पाच वर्षांतील हा सर्वात भीषण अपघात होता (Nepal Plane Crash). नेपाळच्या यति एअरलाइन्सने चालवलेल्या ट्विन-इंजिन एटीआर 72 विमानात 15 परदेशी नागरिकांसह 68 प्रवासी आणि चार क्रू सदस्य होते. परदेशी नागरिकांमध्ये पाच भारतीय, चार रशियन, दोन दक्षिण कोरियाचे आणि प्रत्येकी एक आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना आणि फ्रान्सचा समावेश आहे.

भारतीय प्रवाशांचे नाव आले समोर

यती एअरलाइन्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अभिषेक कुशवाह, विशाल शर्मा, अनिल कुमार राजभर, सोनू जैस्वाल आणि संजना जैस्वाल अशी विमानात बसलेल्या पाच भारतीयांची नावे आहेत . भारतीय दूतावासानेही 68 प्रवाशांमध्ये पाच भारतीयांचा समावेश असल्याची पुष्टी केली आहे.

जाणून घ्या क्रॅश झालेल्या विमानाबाबत 5 महत्वाच्या गोष्टी

  1. एटीआर 72 इटलीमधील एअरबस आणि लिओनार्डो यांच्या संयुक्त उपक्रमाने बनवले आहे. हे मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे ट्विन-इंजिन असलेले टर्बोप्रॉप विमान आहे.
  2. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट FlightRadar24 ने म्हटले आहे की, यती एअरलाइन्सचे विमान 15 वर्षे जुने होते आणि अविश्वसनीय डेटासह जुन्या ट्रान्सपॉन्डर्सने सुसज्ज होते.
  3. यती एअरलाइन्सच्या वेबसाइटनुसार, त्यांच्याकडे सहा ATR72-500 विमानांचा ताफा आहे. यती नेपाळमधील एक प्रमुख देशांतर्गत वाहक म्हणून स्वतःचे वेबसाइटवर वर्णन करते.
  4. यती एअरलाइन्सचे फ्लाइट 9N-ANC ATR-72 रविवारी सकाळपासून तिसर्‍या फ्लाइटवर होते. पहिल्या दिवशी ते काठमांडू ते पोखरा आणि परत काठमांडूला गेले.
  5. काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून यती एअरलाइन्सच्या विमानाने सकाळी 10.33 वाजता उड्डाण केले. पोखरा विमानतळावर उतरत असताना जुने विमानतळ आणि नवीन विमानतळादरम्यान सेती नदीच्या काठावर विमान कोसळले.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.