Nepal plane crash: अपघातग्रस्त विमानाचे फोटो आले समोर
तारा एअरलाइनचे हे विमान पोखरामधून जोमसोमला निघाले होते. मात्र त्यानंतर ते मुस्तांग भागातील कोबान परिसरात कोसळले. या विमानाचे अवशेष मुस्तांग भागात आढळून आले आहेत.

रविवारी नेपाळमध्ये (Nepal) विमान कोसळून मोठा अपघात (Plane crash) झाला होता. या विमानामध्ये एकूण 22 जण होते. या प्रवाशांमध्ये तीन क्रू मेंबर्स, चार भारतीय प्रवासी, दोन जण जर्मनीचे तर एकूण 13 जण हे नेपाळचे प्रवासी होते. तारा एअरलाइनचे हे विमान पोखरामधून जोमसोमला निघाले होते. मात्र त्यानंतर ते मुस्तांग भागातील कोबान परिसरात कोसळले. या विमानाचे अवशेष मुस्तांग भागात आढळून आले आहेत. दरम्यान या अपघातग्रस्त विमानाच्या अवशेषाचे काही फोटो आता समोर आले आहेत. रविवारी हे विमान अचानक बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला. दिवसभर शोधमोहीम राबवल्यानंतर रविवारी दुपारी चार वाजता हे विमान कोसळल्याचे जाहीर करण्यात आले. या अपघातग्रस्त विमानाच्या अवषेशाचे (aircraft wreckage) काही फोटो आज समोर आले आहेत. या फोटोनमधून विमानाचा किती भयानक पद्धतीने अपघात झाला असावा याची कल्पाना येते.
खराब हवामानमुळे बचाव कार्यात अडथळे
रविववारी हा विमान अपघात झाला होता. विमान दुर्घटनेनंतर खराब हवामानामुळे घटनास्थळापर्यंत पोहोचण्यात अडथळे येत होते. मात्र नेपाळच्या लष्कराने अपघातस्थळ शोधले आहे. याबाबत बोलताना नेपाळ लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले की, नेपाळचे सैन्य दल हवाई मार्गाने घटनास्थळी पोहोचले असून, बचाव कार्याला सुरुवात झाली आहे. खराब हवामान आणि ढगाळ वातावरणामुळे अपघातस्थळापर्यंत पोहोचण्यास अनेक अडचणी आल्या. मात्र आता नेपाळचे लष्कर हे अपघात स्थळी पोहोचले आहेत. या विमानात एकूण 22 जण प्रवास करत होते अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.



Nepal | Crashed Tara Air aircraft located at Sanosware, Thasang-2, Mustang
The aircraft with 22 people including four Indians onboard went missing yesterday.
(Photo source: Nepal Army) pic.twitter.com/W4n5PV3QfA
— ANI (@ANI) May 30, 2022
विमानात चार भारतीयांचा समावेश
दरम्यान रविवारी नेपाळमध्ये ज्या विमानाचा अपघात झाला त्या विमानामध्ये एकूण 22 जण प्रवास करत होते. या विमानात चार भारतीयांचा देखील समावेश होता. मिळत असलेल्या माहितीनुसार अशोक कुमार त्रिपाठी, वैभवी बांदेकर धनुष आणि रितिका असे या विमानात असलेल्य भारतीय व्यक्तींची नावे आहेत. अशोक कुमार त्रिपाठी आणि वैभवी बांदेकर यांचा घटस्फोट झाला आहे. मात्र ते वर्षातून एकदा आपली मुले धनुष आणि रितिका यांना घेऊन परदेशात पर्यटनाला जातात. यंदा ते नेपाळला गेले होते. याचादरम्यान हा अपघात झाला आहे.