Donald Trump Greenland : सत्तेवर येण्याआधीच ट्रम्प यांची एक देश हडपण्याची प्लानिंग, अमेरिकेला का हवय ग्रीनलँड?
Donald Trump Greenland : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली. अजून त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतलेली नाही. या महिन्यात ते शपथ घेतील. सत्तेवर येण्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांची ग्रीनलँड या देशावर नजर आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना हा देश का बळकावायचा आहे? त्यामागे काय कारणं आहेत? जाणून घेऊया.
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा जोश सध्या हाय आहे. ग्रेटर अमेरिका बनवणार हे त्यांनी जाहीररित्या घोषित केलय. कॅनडा, पनामा कालवा आणि ग्रीनलँड हे त्यांच्या ग्रेटर अमेरिका प्लानचा भाग आहे. ग्रीनलँड डेनमार्ककडून परत घ्यायचा त्यांचा इरादा आहे. या मिशनवर त्यांनी आपला मुलगा ट्रम्प ज्यूनियरला ग्रीनलँडला पाठवलय. ग्रीनलँडबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांची रुची बघून लोकांच्या मनातही कुतूहल निर्माण झालय की, ग्रीनलँडमध्ये असं काय खास आहे?, ज्यासाठी ट्रम्प इतके उतावीळ झालेत. ग्रीनलँडमध्ये 2.16 मिलियन वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेलं जगातील सर्वात मोठं बेट आहे. डेन्मार्कच्या नियंत्रणाखाली असलेलं हा स्वायत्त देश आहे. अमेरिकेसाठी रणनितीक आणि सुरक्षेच्या दृष्टीने ते खूप खास आहे.
ग्रीनलँडबद्दल बोलायच झाल्यास तिथे दुर्मिळ खनिजांच भंडार आहे. तेल आणि गॅसही भरपूर प्रमाणात आहे. एका अंदाजानुसार 50 बिलियन बॅरल तेल आहे. बर्फ वितळल्यास भविष्यात एक नवीन समुद्री मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाच म्हणजे 2023 मध्ये प्रकाशित झालेल्या जियोलॉजिकल सर्वेनुसार अमेरिकेच्या दृष्टीने विशेष महत्त्व असलेल्या 50 पैकी 37 खनिजं ग्रीनलँडमध्ये मध्यम आणि उच्च प्रमाणात आहेत.
अमेरिकेला का हवं ग्रीनलँड?
ग्रीनलँडची लोकसंख्या फक्त 56 हजार आहे. इथला जीडीपी 3.3 बिलियन डॉलर आहे. ग्रीनलँड ताब्यात आल्यास समुद्री व्यापारावर अमेरिकेच वर्चस्व निर्माण होईल. आर्कटिकमध्ये नवीन व्यापार मार्गावर वर्चस्व मिळेल.
अमेरिकेसाठी रणनितीक दृष्टीने तो मोठा विजय
ग्रीनलँडचा चौथा हिस्सा बर्फाने झाकलेला आहे. यात जगातील 7 टक्के गोड्या पाण्याच भंडार आहे. ट्रम्प ग्रीनलँड परत मिळवण्यात यशस्वी ठरले, तर अमेरिकेसाठी रणनितीक दृष्टीने तो मोठा विजय असेल. अमेरिका अधिक मजबूत होईल. भविष्यात अनेक धोक्यांपासून अमेरिकेचा बचाव होऊ शकतो.
डोनाल्ड ट्रम्प हे पक्के बिझनेसमन
डोनाल्ड ट्रम्प हे पक्के बिझनेसमन आहेत. स्वत:च्या आर्थिक हितासाठी या देशाने आतापर्यंत वाट्टेल ते केलय. इराकमध्ये रासायनिक शस्त्र असल्याचा हवाला देऊन तिथे केलेला हल्ला. यामागे तिथल्या तेल विहिरींचा उद्देश होता. आता अमेरिकेची नजर ग्रीनलँडवर आहे.