Covid Updates: चीनमधल्या झुआन्घे विद्यापीठ कॅम्पस लॉक, एकाएक 1,500 विद्यार्थी हॉटेलमध्ये स्थलांतरित
डेलियनमधल्या झुआन्घे विद्यापीठात (Zhuanghe University) अनेक कोविडचे रूग्ण सापडल्यानंकर, चीन सरकारने एकाएक शेकडो विद्यार्थ्यांना स्थलांतरित केले. विद्यापीठातील सुमारे 1,500 विद्यार्थ्यांना त्यांच्या वसतिगृहांमध्ये आणि हॉटेलमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्याचे आदेश रविवारी दिले गेले.
चीनच्या डेलियन (Dalian) शहरात कोविड-19 चा उद्रेक झाला आहे. डेलियनमधल्या झुआन्घे विद्यापीठात (Zhuanghe University) अनेक कोविडचे रूग्ण सापडल्यानंकर, चीन सरकारने एकाएक शेकडो विद्यार्थ्यांना स्थलांतरित केले. विद्यापीठातील सुमारे 1,500 विद्यार्थ्यांना त्यांच्या वसतिगृहांमध्ये आणि हॉटेलमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्याचे आदेश रविवारी दिले गेले.
China is battling the spread of its biggest COVID-19 outbreak caused by the Delta variant, with travelers from Dalian city, where infections have grown faster than elsewhere in the country subject to tough quarantine rules in nearby areas https://t.co/Z0VYWardZq pic.twitter.com/P2IqMGN2Lt
— Reuters (@Reuters) November 15, 2021
विद्यापीठ परिसरात एकाएक लावलेला लॉकडाऊन हा चीनच्या कोविड-19 च्या उद्रेकावर ज़ीरो टॉलरेंस पोलिसीचं ताजं उदाहरण आहे, ज्याने लोकांच्या जीवनात मोठ्या प्रमाणात व्यत्यय आला आहे. क्वारंटाईन मध्ये रहाणे, अनिवार्य कोविड चाचणी आणि प्रवास निर्बंध हा चीनी लोकांसाठी दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. चीन देशाचा लसीकरण दर जगात सर्वात जास्त आहे आणि हिवाळ्यात बूस्टर डोसही दिला जाणार आहे. तरीही अशी परिस्थिती आहे. कोविडचा मागच्या महीन्यापासून अनेक शहरांमध्ये उद्रेक झाला आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन केले गेले आहे.
बुधवारपासून, राजधानी बीजिंगमध्ये, देशाच्या इतर भागातून विमान, ट्रेन किंवा कारने येणार्या सर्व लोकांना मागील 48 तासांत घेतलेल्या कोविड चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणे आवश्यक आहे. चीनमध्ये आतापर्यंत एकूण 98,315 रुग्णांची आणि 4,636 मृत्यू नोंद झाली आहे.
हे ही वाचा –