new york brooklyn shooting : अमेरिकेतील ब्रुकलीन स्टेशनवर हल्ला, संशयास्पद फोटो आला समोर, काय आहे त्या फोटोमध्ये?

न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन सबवे स्टेशनवर मंगळवारी रात्री गोळीबार झाला. यामध्ये आतापर्यंत वीस लोक जखमी झाल्याची माहिती आहे. यातच आता एक फोटो समोर आला आहे.

new york brooklyn shooting : अमेरिकेतील ब्रुकलीन स्टेशनवर हल्ला, संशयास्पद फोटो आला समोर, काय आहे त्या फोटोमध्ये?
न्यूयॉर्कमधील मेट्रो स्टेशनवर गोळीबारImage Credit source: AP
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 10:36 AM

दिल्ली : न्यूयॉर्कच्या (new york) ब्रुकलीन (brooklyn) सबवे स्टेशनवर मंगळवारी रात्री गोळीबार (shooting) झाला. यामध्ये आतापर्यंत वीस लोक जखमी झाल्याची माहिती आहे. तर अमेरिकेनं मात्र अद्याप तरी या प्रकरणात कोणताही दहशतवादी हल्ल्या झाल्याचं बोललेलं नाही किंवा ते नाकारलं देखील नाही. कोणी हल्ला केला याबाबत अद्यापपर्यंत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, एक फोटो समोर आला आहे. याची चौकशी पोलीस करत आहे. हा हल्ला इतका धक्कादायक होता की यामध्ये जवळपास वीस लोक जखमी झाले आहेत. मात्र, अमेरिका यावर सावध भूमिका घेताना दिसत असून कोणतीही प्रतिक्रिया थेट देत नाहीये. त्यामुळे याकडे जागतिक स्तरावर वेगळ्या दृष्टीन पाहिलं जातंय. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. याप्रकरणी सखोली चौकशी केली जातेय. मात्र, हल्ला झाल्याचं अमेरिकेच्या इंटेलिजन्सला कसं कळालं नाही, याची माहिती त्यांना का नव्हती, याविषयी देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जातायेत.

हल्लेखोराविषयी माहिती समोर

ज्यावेळे रेल्वे स्टेशनवर सर्वाधिक गर्दी असते. त्याचवेळी मंगळवारी हा भयानक हल्ला झाला. हल्लेखोर हा गॅस मास्क घालून आला होता. त्याने वेगळेच कपडे घातले होते. रेल्वे स्टेशनवर आधी हल्लेखोराने ग्रेनेडसारखं फेकलं आहे. त्यानंतर त्याठिकाणी धुर झाला. त्यानंतर गोळीबार करण्यात आला. ज्यामध्ये आता वीस लोक जखमी असल्याची माहिती आहे.

न्यूयॉर्क पोलिसांनी काय म्हणाले?

न्यूयॉर्क पोलिसांनी हल्ल्याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. 8 वाजून 27 मिनिटांनी पोलिसांना एक कॉल आला आणि त्या व्यक्तीने सबवे स्टेशनवर गोळीबार झाल्याची माहिती दिली. दोन हल्लेखोर होते अशी माहिती प्रथम मिळाली होती मात्र हल्लेखोर एकच होता, असे आता स्पष्ट करण्यात आले आहे. हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला असला तरी पुढील धोका लक्षात घेत संपूर्ण शहरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, या गोळीबार प्रकरणी न्यूयॉर्कमधून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेट्रो स्टेशनवर झालेला हल्ला दहशतवादी हल्ला आहे.

आंतरराष्ट्रा माध्यमांना काय म्हटलंय?

न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मेट्रो स्थानकावर धूर देखील मोठ्या प्रमाणात होता. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत कुणालाही अटक केलेली नाही. पण आतापर्यंत जो तपास करण्यात आलाय त्यामध्ये गोळीबार करणारे आरोपी हे मेट्रो स्टेशनवर कन्स्ट्रक्शनचं काम करणाऱ्या कामगारांचे कपडे परिधान करुन आलेले होते. आता या संपूर्ण प्रकरणात अमेरिका काय पाऊलं उचलते, ते पाहणं महत्वाचं ठरेल.

इतर बातम्या

Jaipur Crime | आर्मी ऑफिसर असल्याचा बनाव, 50 हून अधिक तरुणींशी संबंध, बलात्कारानंतर निर्घृण हत्या

शॉर्टसर्किटमुळे पाच एकर ऊस जळून खाक

Hair Care : उन्हाळ्यात केसांची चमक टिकवण्यासाठी व्हिटॅमिन सी असलेले हे पदार्थ केसांना लावा!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.