VIDEO: जेव्हा न्यूझीलंडच्या पंतप्रधानांची अडीच वर्षांची मुलगी फेसबुक लाईव्हच्या मध्ये येते! बघा हा मजेदार आणि भावपूर्ण संवाद
ही घटना रविवार-सोमवार म्हणजेच 8-9 नोव्हेंबर 2021 च्या रात्रीची आहे. त्यावेळी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न ‘फेसबुक लाईव्ह’ कार्यक्रमात कोविड-19 महामारीवर देशातील जनतेला संबोधित करत होत्या. ते फेसबुक लाईव्ह त्यांच्या कॅम्प ऑफिसमधून चालू होते.
न्यूझीलंडच्या पंतप्रधानांसोबत नुकतीच एक अशी मजेदार आणि भावपूर्ण घटना घडली ज्याच्याकडे पुर्ण जगाचं लक्ष जातय. न्यूझीलंडचे पंतप्रधान जॅसिंडा केट लॉरेल आर्डर्न (Jacinda Kate Laurell Ardern) या ‘फेसबुक लाईव्ह’ ने अख्या देशातील जनतेला संबोधित करत असतांना त्यांची अडीच वर्षांची मुलगी झोपेतून उठली आणि लाईव्ह कार्यक्रमाच्यामध्ये आली. त्या लहान मुलीचा तीच्या आईकडे गोड हट्ट आणि आई म्हणजेच पंतप्रधानांनी तीला घातलेली समजूत, हा संवाद पुर्ण देशाच्या जनतेनी पाहिला. एक आई आणि एक महिला राष्ट्राधक्ष म्हणून त्यांच जगभर कौतूक होतय. (New Zealand Prime Minister Facebook like interrupted by daughter)
काय घडलं नेमकं
ही घटना रविवार-सोमवार म्हणजेच 8-9 नोव्हेंबर 2021 च्या रात्रीची आहे. त्यावेळी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न ‘फेसबुक लाईव्ह’ कार्यक्रमात कोविड-19 महामारीवर देशातील जनतेला संबोधित करत होत्या. ते फेसबुक लाईव्ह त्यांच्या कॅम्प ऑफिसमधून चालू होते (तात्पुरते त्यांचे कॅम्प ऑफिस घरून चालवले जात आहे).
सध्या न्यूझीलंडची कोविड वाईट परिस्थिती आहे, त्यामूळे देशातील जनतेने सरकारी यंत्रणेसोबत मिळून या साथीचा सामना कसा करायचा. कोरोनाला तोंड देण्यासाठी त्यांनी आपल्या स्तरावर कोणती खबरदारी घेतली आहे आणि जनतेने कठोर नियमांचे पालन केले तरच कोरोनाला मात देता येईल, हे पंतप्रधान सांगत होत्या. तेवढ्यात, पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांची अडीच वर्षांची मुलगी नीव-जी तिच्या आजीसोबत दुसऱ्या खोलीत झोपलेली होती ती तीच्या आई जवळ आली. त्या वेळी फेसबुक लाईव्ह कार्यक्रम चालूच होता. मात्र, महिला पंतप्रधानांनी काही गडबड न करता, अतिशय हुशारीने आणि संयमाने परिस्थितीत सांभाळली. पंतप्रधानांनी पहिला न्यूझीलंडच्या लोकांची माफी मागितली, आणि झोपेतून जागी झालेल्या मुलीशी बोलून त्याला तीला समजावू लागल्या.
पंतप्रधान आर्डर्न यांनी मुलगी नीवला सांगितलं की, त्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेला संबोधित करत आहे. रात्रीची वेळ आहे. मुलीने आजीकडे जाऊन झोपावे. न्यूझीलंडच्या लोकांनी जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला लाईव्ह कार्यक्रमात तेव्हा तेही ही सर्व थक्क झाले. देशाचे पंतप्रधान आणि आई या देऊनही भुमीका एकाच वेळी निभवत असणाऱ्या आर्डर्न यांनी वारंवार समजवून ही मुलगी एैकत नव्हती. आईला सोबत घेतल्याशिवाय झोपणार नाही, असा नीवचा हट्ट होता. या सगळ्यामध्ये पंतप्रधानांनी तीन-चार वेळा थेट कार्यक्रमात न्यूझीलंडच्या लोकांची माफी मागितली आणि दिलगिरी व्यक्त केली.
त्याचवेळी त्यांनी देशातील जनतेला सांगितले की, “माझी आई यावेळी माझ्या मुलीसोबत उपस्थित आहे हे भाग्याचे आहे. त्या तीची काळजी घेतात. एवढेच नाही तर फेसबुक लाईव्ह कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी जनतेला विचारले की, “फेसबुक लाईव्हसाठी ही वेळ योग्य असेल का? दुसऱ्याची मुलं सुद्धा रात्री तीन-चार वेळा उठतात का?” या सगळ्यामध्ये मुलगी नीव पुन्हा लाईव्ह कार्यक्रमाच्या मध्ये येते आणि आईला विचारू लागते, तिला इतका वेळ का लागतोय?
अखेर आपल्या मुलीच्या आग्रहापुढे आपण जिंकू शकणार नाही असे पंतप्रधान जॅसिंडा यांना वाटू लागल्यावर त्यांनी फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात देशवासीयांची माफी मागितली आणि कदाचित आता मला हा कार्यक्रम मध्येच थांबवावा लागेल असे सांगितले. नीवची झोपायची वेळ झाली आहे. आणि आता मला सोबत घेऊनच ती झोपू शकेल. शेवटी, फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात सहभागी असलेल्या न्यूझीलंडच्या लोकांचे आभार मानून पंतप्रधानांनी कार्यक्रम थांबवला.
Other News