अमेरिकेनं भारताचं ‘रॉ’ मटेरियल रोखलं, चीननं डिवचलं, तीन देश, एक कार्टून, वाचा सविस्तर

चीनने अमेरिकेला भारतात कोरोनाचं संकट आलेलं असताना कोरोना लसीच्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर लावलेल्या निर्बंधावरुन चांगलंच घेरलंय.

अमेरिकेनं भारताचं 'रॉ' मटेरियल रोखलं, चीननं डिवचलं, तीन देश, एक कार्टून, वाचा सविस्तर
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 11:00 PM

बीजिंग : चीनने अमेरिकेला भारतात कोरोनाचं संकट आलेलं असताना कोरोना लसीच्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर लावलेल्या निर्बंधावरुन चांगलंच घेरलंय. चीनची सरकारी वृत्तसंस्था असलेल्या ग्लोबल टाईम्सने एक कार्टून प्रकाशित केलंय. यात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी आपण भारतासोबत असल्याच्या वक्तव्याचा आधार घेत शाब्दिक फुलोऱ्यांपेक्षा कृतीच अधिक स्पष्टपणे बोलते असं म्हटलंय. भारतात एकिकडे कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढतेय, तर दुसरीकडे कोरोनावर उपचार करणाऱ्या औषधांसह ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्यातच सीरम इन्स्टिट्युटला कोरोना लसी तयार करण्यासाठी आवश्यक असलेला अमेरिकेतून येणारा कच्चा मालही कमी पडलाय. अमेरिकेने मात्र याबाबत आडमुठी भूमिका घेतल्याचं दिसतंय. यावरुनच चीनने अमेरिकेला लक्ष्य केलंय (News agency Global Times of China criticize America in Cartoon on Vaccine raw material India).

ग्लोबल टाईम्सच्या या कार्टूनमध्ये अमेरिका आपण भारतीय नागरिकांसोबत असल्याचं बोलताना दाखवलंय. मात्र, दुसरीकडे कोरोना लसीच्या कच्च्या मालावर निर्बंध लावत असल्याचं रेखाटलंय. हे कार्टून ट्विटरवर पोस्ट करताना ग्लोबल टाईम्सने शब्दांपेक्षा कृती अधिक मोठ्याने बोलते असं कॅप्शन दिलंय. तसेच व्हॅक्सिन रॉ मटेरियल आणि इंडिया फाईट्स कोविड 19 हे दोन हॅशटॅग वापरले आहेत.

‘जो बायडन सर, कळकळीची विनंती, लसीच्या कच्च्या मालावरील निर्बंध हटवा’

दरम्यान, कोरोना लसींसाठी लागणारा कच्चा माल अमेरिका आणि युरोपातील काही देशांनी रोखून धरल्याने सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी ट्विटरवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना टॅग करुन अमेरिकेने कच्च्या मालावरील हे निर्बंध उठवावे, अशी विनंती केली होती.

अदर पुनावाला नेमकं काय म्हणाले?

“आदरणीय जो बायडन सर, कोरोना विरोधाच्या या लढाईत आपण खरंच एकत्र लढत असू तर माझी कळकळीची एक नम्र विनंती आहे. कोरोना लसीसाठी लागणारा कच्चा माल अमेरिकेत रोखून ठेवण्यात आला आहे. कृपया कच्च्या मालावरील हे निर्बंध तातडीने हटवा, जेणेकरुन लसीचे उत्पादन वाढवता येईल”, असं अदर पुनावाला ट्विटरवर म्हणाले आहेत. मात्र, त्यावर अद्याप बायडन यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

‘आताच कच्च्या मालाची जास्त आवश्यकता’

अदर पुनावाला यांनी चार दिवसांपूर्वी ‘इंडिया टूडे’ला दिलेल्या मुलाखतीत लसीच्या उत्पादनावरुन चिंता व्यक्त केली होती. “लसीसाठी आवश्यक असलेला कच्चा माल अमेरिका आणि युरोपातील काही देशांनी रोखून धरला आहे. हाच सर्वात मोठा अडथळा आहे, ज्यामुळे उत्पादन वाढवणं आव्हान होऊन बसलं आहे. आम्हाला आताच कच्च्या मालाची सर्वात जास्त गरज आहे, ज्यामुळे भारत आणि जगाच्याही लसीची गरज पूर्ण होऊ शकते”, असं पुनावाला यांनी सांगितलं होतं.

‘अमेरिकेकडून आडकाठीचं धोरणं, मात्र रशियाकडून मदतीचा हात’

एकिकडे अमेरिकेने कोरोना लसीसाठीचा कच्चा माल अडकवला आहे, तर दुसरीकडे अमेरिकेचा पारंपारिक शत्रू रशियाने भारताला मदतीचा हात पुढे केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत रशियाकडून ऑक्सिजन कंसंट्रेटर्स आणि टँकर खरेदी करण्यावर विचार करत आहे. या योजनेची अंमलबजावणी झाल्यास ऑक्सिजनच्या तुटवड्याचा सामना करणाऱ्या भारताला मोठी मदत होणार आहे.

कोरोना लसींच्या कच्च्या मालावर निर्यातबंदी, मानवतेचा पुळका असलेल्या अमेरिकची मानवता कुठे हरवली? शिवसेनेचा सवाल

कोरोना प्रतिबंधक लसींच्या कच्च्या मालावर निर्यातबंदी लादून अमेरिकेने आढेबाजीचा जो अमानुषपणा चालविला आहे तो संतापजनक आहे. ‘युनो’सारख्या संघटनेने आणि मानवतेची चाड असणाऱ्या सर्वच देशांनी या माणुसकीशून्य धोरणाचा जाब अमेरिकेला विचारायलाच हवा! अमेरिकेला मानवी हक्क आणि मानवतेचा खरेच इतका पुळका असेल तर कोरोनासारख्या जागतिक संकटकाळात अमेरिकेची ही मानवता कुठे हरवली आहे? असा सवाल शिवसेनेनं केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या वृत्तपत्राच्या अग्रेलखात कोरोना लसींवरील कच्च्या मालाच्या निर्यातबंदीवर भाष्य करण्यात आले आहे.

सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?

अधिकाधिक लोकांचे प्राण वाचावे, यासाठी भारताने आता 18 वर्षांच्या वरील सर्वांनाच लस देण्याची घोषणा केली आहे. लसीकरणाचा हा कार्यक्रम किंवा उत्सव यशस्वीपणे राबविण्यासाठी लसींच्या उत्पादनाचा वेग वाढणेही तितकेच आवश्यक आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधक लसींच्या कच्च्या मालावर निर्यातबंदी लादून अमेरिकेने आढेबाजीचा जो अमानुषपणा चालविला आहे तो संतापजनक आहे. ‘युनो’सारख्या संघटनेने व मानवतेची चाड असणाऱ्या सर्वच देशांनी या माणुसकीशून्य धोरणाचा जाब अमेरिकेला विचारायलाच हवा! असा हल्लाबोल शिवसेनेनं केला आहे.

हेही वाचा :

कोरोना लसींच्या कच्च्या मालावर निर्यातबंदी, मानवतेचा पुळका असलेल्या अमेरिकची मानवता कुठे हरवली? शिवसेनेचा सवाल

‘जो बायडन सर, कळकळीची विनंती, लसीच्या कच्च्या मालावरील निर्बंध हटवा’, अदर पुनावाला यांचे अमेरिकेच्या अध्यक्षांना विनवण्या

व्हिडीओ पाहा :

News agency Global Times of China criticize America in Cartoon on Vaccine raw material India

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.