हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाहच्या मृत्यूची बातमी देताना न्यूज अँकरला रडू कोसळले, व्हिडियो व्हायरल

Viral Video: नसराल्लाह याला इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचे निकटवर्तीय मानले जात होते. हिजबुल्ला हा या प्रदेशात इस्रायल आणि अमेरिकेविरुद्धच्या विरोधाचा केंद्रबिंदू होता. नसराल्लाह दीर्घकाळापासून इस्रायली लष्कराचे लक्ष्य होता. म्हणूनच तो सार्वजनिक ठिकाणी दिसत नव्हता.

हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाहच्या मृत्यूची बातमी देताना न्यूज अँकरला रडू कोसळले, व्हिडियो व्हायरल
न्यूज अँकरला रडू कोसळले
Follow us
| Updated on: Sep 29, 2024 | 6:58 PM

Hassan Nasrallah Killed: इस्त्रायलने शुक्रवारी लेबनानमध्ये मोठा हल्ला केला. या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाहचा मृत्यू झाला. शुक्रवारी इस्त्रायलच्या लष्कराकडून हसन नसरल्लाहचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर शनिवारी हिजबुल्लाहकडून या बातमीला दुजोरा देण्यात आला. लेबनानमधील टीव्ही चॅनलवर हिजबुल्लाहने हसन नसरल्लाचा मृत्यू झाल्याच्या वृत्तास दुजारा दिला. हसन नसरल्लाचा मृत्यूची बातमी देताना लाईव्ह शोमध्ये  अँकरला रडू कोसळले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बातमी देणे अवघड होत होते

लेबनानमध्ये अल-मायादीन हे टेलीव्हिजन चॅनल आहे. या चॅनलची न्यूज एंकर 64 वर्षीय नसरल्लाह यांच्या मृत्यूची बातमी देत होती. लेबनानकडून इस्त्रायलद्वारे करण्यात आलेल्या हवाई हल्ल्याची माहिती दिली जात होती. त्या हवाई हल्ल्यात हसन नसरल्लाचा मृत्यू झाला, असे सांगताना अँकरला रडू कोसळले. वारंवार प्रयत्न करुन जेव्ह नसरल्लाह यांचे नाव येत होते तेव्हा तिच्या आवाजात कंप येत होता. तिला स्वतःवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले. अल-मायादीन चॅनल हे हिजबुल्लाह समर्थक आहे.

हे सुद्धा वाचा

नसराल्लाहच्या मृत्यूनंतर महिला रडल्या

हिजबुल्लाला या संघटनेला जगातील अनेक देशांनी दहशतवादी संघटना जाहीर केले आहे. परंतु लेबनॉनमध्ये या संघटनेची सरकारवर चांगली पकड आहे. नसराल्लाह यांच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर शेकडो लोक लेबनॉनच्या रस्त्यावर उतरून दु:ख व्यक्त करत होते. शनिवारी बेरूतमध्ये नसराल्लाला आठवणीत महिला रडताना दिसल्या.

नसरल्लाहने 1992 मध्ये हिजबुल्लाहची सूत्र हाती घेतली होती. त्यानंतर हिजबुल्लाह लेबनानमध्ये फक्त लष्करी ताकदच नाही तर एक मोठी राजकीय शक्ती बनली. त्याच्या नेतृत्वात हिजबुल्लाहने इस्त्रायलविरोधात अनेक युद्ध लढली. त्यात काही ठिकाणी यश सुद्धा मिळाले. त्यामुळे नसरल्लाह याला मानणारा मोठा वर्ग लेबनानमध्ये तयार झाला.

नसराल्लाह याला इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचे निकटवर्तीय मानले जात होते. हिजबुल्ला हा या प्रदेशात इस्रायल आणि अमेरिकेविरुद्धच्या विरोधाचा केंद्रबिंदू होता. नसराल्लाह दीर्घकाळापासून इस्रायली लष्कराचे लक्ष्य होता. म्हणूनच तो सार्वजनिक ठिकाणी दिसत नव्हता.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.