जर्मनीत News9 ग्लोबल समिटचा सजला मंच, पंतप्रधान मोदी करणार संबोधित

देशातील नंबर-1 न्यूज नेटवर्क TV9 च्या News9 ग्लोबल समिटमधील पहिल्या दिवशी भारत आणि जर्मनीतील शाश्वत आणि निरंतर विकासावर मंथन झालं. आज समिटचा दुसरा दिवस असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रस्थानी असतील. India: Inside the Global Bright Spot या विषयावर ते विचार मांडतील.

जर्मनीत News9 ग्लोबल समिटचा सजला मंच, पंतप्रधान मोदी करणार संबोधित
News9 च्या ग्लोबल समिटमध्ये आज पंतप्रधान मोदी करणार संबोधितImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Nov 22, 2024 | 10:31 AM

News9 ग्लोबल समिटच्या जर्मन आवृत्तीचा काल प्रारंभ झाला असून आज या समिटचा दुसरा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या समिटमध्ये उपस्थितांना संबोधित करणार आहेत. मात्र तत्पूर्वी अनेक महत्वपूर्ण सेशन्स होतील, त्यामध्ये भारत आणि जर्मनीचे नेते, कॉर्पोरेट लीडर्स, प्रसिद्ध व्यक्ती आणि दिग्गज सेलिब्रिटी हे देखील सहभागी होतील. या जागतिक समिटमध्ये आज ग्रीन एनर्जी, एआय, डिजिटल अर्थव्यवस्था , कौशल्य विकास इत्यादी अनेक मुद्यांवर चर्चा होईल.

देशातील नंबर-1 न्यूज नेटवर्क TV9 च्या News9 ग्लोबल समिटच्या पहिल्या दिवशी भारत आणि जर्मनीतील शाश्वत आणि निरंतर विकासावर मंथन झालं. यामध्ये भारताचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि ज्योतिरादित्य सिंधियांसारखे अनेक मोठे नेते सहभागी झाले होते. आज या समिटचा दुसरा दिवस असून Tv9 नेटवर्क चे MD & CEO बरुण दास यांच्या भाषणाने झाली. त्यानंतर जर्मनीचे फूड अँड ॲग्रीकल्चर मिनिस्टर सेम ओजदेमिर हे समिटमधील उपस्थितांना संबोधित करतील.

आज कोणती सेशन्स ?

News9 ग्लोबल समिटच्या दुसऱ्या दिवशी Tv9 नेटवर्क चे MD & CEO बरुण दास यांच्या भाषणानंतर दिवसभरात भारत आणि जर्मनीचे धोरणकर्ते दोन्ही देशांच्या शाश्वत आणि निरंतर विकासाबद्दल चर्चा करतील. यामध्ये हरित ऊर्जा ( ग्रीन एनर्जी), एआय, डिजिटल अर्थव्यवस्था, भारताच्या संरक्षण उद्योगासह कौशल्य विकास आणि आजचा युनिकॉर्न यावर चर्चा होणार आहे.

पंतप्रधान मोदी मुख्य अतिथी

या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी, पोर्शे, मारुती, सुझुकी, मर्सिडीज बेंझ, भारत फोर्स, भारत आणि जर्मनीच्या अनेक व्यावसायिक संस्था, इंडो जर्मन चेंबर ऑफ कॉमर्स आणि ASSOCHAM सारख्या व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी विचारमंथन करतील. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. या जागतिक मंचावरून देशाला आणि विश्वाला काय संदेश देतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. India : Inside the Global Bright Spot या विषयावर पंतप्रधान मोदी आपले विचार मांडणार आहेत.

आजचे प्रमुख वक्ते

न्यूज9 समिटच्या दुसऱ्या दिवशी ग्रीन एनर्जीवर फ्रॉनहोफरचे संचालक एंड्रियाज बेट, इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे अजय माथूर, TERI च्या डीजी विभा धवन, हिरो फ्युचर एनर्जीचे सीएमडी राहुल मुंजाल हे चर्चा करतील तर एआय यावर ग्लोबल इंडस्ट्री सेक्टर लीड सप्लायरचे पार्टनर स्टीफन, एआय लँग्वेज टेकचे प्रमुख डॉ. जन नीह्यूस, टेक महिंद्रा यूरोपचे प्रमुख हर्षुल अंसानी आणि मायक्रॉन इंडियाचे एमडी आनंद राममूर्ति चर्चा करणार आहेत.त्याव्यतिरिक्त कौशल्य विकास, इनसाइड द माइंड ऑफ GenZ कंन्झ्यूमर यासारख्या महत्वपूर्ण विषयांवरही मंथन होणार आहे.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्.