Nigeria : क्रूरतेचा कळस! अंदाधुंद गोळीबारात 200 ठार, दिसेल त्याच्यावर निशाणा का लावला नराधमांनी?

Nigeria News : नायजेरीयामध्ये झालेल्या या हल्ल्याबद्दल स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी या घटनेचा थरारक अनुभव सांगितला आहे. जो दिसेल, त्याता हे माथेफिरु गुंड गोळ्या घालून ठार करत होते, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. 10 गावांमध्ये आतापर्यंत 140 पेक्षा जास्त लोकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

Nigeria : क्रूरतेचा कळस! अंदाधुंद गोळीबारात 200 ठार, दिसेल त्याच्यावर निशाणा का लावला नराधमांनी?
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 5:44 PM

नायजेरीयात एक भाग झाले ज्याचं नाव आहे स्टेट झाम्फ्रा. या भागात प्रचंड दहशत पसरली आहे. जो दिसेल त्याच्यावर माथेफिरू डाकूंनी बेछूट गोळीबार केला आहे. आतापर्यंत या गोळीबारात तब्बल 200 जण ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्याच आठवड्यामध्ये लष्करानं नायजेरीयातील डाकूंचे अड्डे हवाई हल्ल्या नेस्तनाबूत केले होते. त्यानंतर आता या गुंडांनी याचा बदला घेत अंदाधुंद गोळीबार करत निष्पाप नागरिकांचा जीव घेतल्याची घटना समोर आली आहे. नायजेरीयातील सरकारनं 58 लोकांचा मृत्यू झाला असल्याचं म्हटलं आहे. मात्र स्थानिक लोकांनी तब्बल 200 किंवा त्यापेक्षाही जास्त लोक ठार झाले असण्याचा संशय आणि भीती व्यक्त केली आहे.

वादाची सुरुवात कुठून?

गेल्या आठवड्यातच सोमवारी जाम्फ्रातील गुसामी जंगल आणि पश्चिमेतील काही गावांत हवाई हल्ला केला होता. यामध्ये नायजेरीयात दहशत पसरवणाऱ्या काही गँगच्या दोन मोठ्या नेत्यांसब तब्बल 100 जणांचा खात्मा करण्यात आला होता. त्यानंतर बंदुका घेऊन 300 हून अधिक गुंडांनी स्थानिक परिसरातील गावांत हल्लाबोल केला. अनेक गावांत या गुंडांनी नासधूस आणि तोडफोड केली. यावेळी नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आणि काही ठिकाणी जाळपोळ करत स्थानिक लोकांच्या मालमत्तेचं नुकसानही करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं.

दिसेल, त्याची गोळ्या घालून हत्या

नायजेरीयामध्ये झालेल्या या हल्ल्याबद्दल स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी या घटनेचा थरारक अनुभव सांगितला आहे. जो दिसेल, त्याता हे माथेफिरु गुंड गोळ्या घालून ठार करत होते, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. 10 गावांमध्ये आतापर्यंत 140 पेक्षा जास्त लोकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. अजूनही अनेक प्रेत बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जातो आहे. दरम्यान, आता दहशत माजवणाऱ्या या माथेफिरुंवर नायजेरीयातील सरकार नेमकं कसं नियंत्रण मिळवलं आणि नायजेरीतील नागरिकांची सुटका करण्यासाठी काय प्रयत्न करतं हेही पाहणं महत्त्वाचं आहे.

इतर बातम्या –

VIDEO | भलामोठा खडक बोटीवर कोसळला, भीषण अपघातात सात जणांना जलसमाधी

ऑनलाईन रिलेशनशीपमध्ये तिने ‘बॉयफ्रेण्ड’ समूजन बहिणीशी केले चॅटींग; 10 वर्षांनंतर झाला उलगडा

नववर्षाला फ्रान्समध्ये का जाळल्या गेल्या 874 गाड्या,या विवादास्पद परंपरा मागील काय आहे नेमके कारण ?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.