भारताला कोणीही रोखू शकत नाही, अमेरिकेच्या रे डॅलिओ यांनी कोणासोबत केली मोदींची तुलना

Ray Delio on Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात G-20 summit यशस्वीपणे पार पडल्यानंतर अमेरिकेतील गुंतवणूकदार रे डॅलियो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलना एका व्यक्तीसोबत केली आहे, ती व्यक्ती कोण आहे. जाणून घ्या.

भारताला कोणीही रोखू शकत नाही, अमेरिकेच्या रे डॅलिओ यांनी कोणासोबत केली मोदींची तुलना
Follow us
| Updated on: Sep 18, 2023 | 5:27 PM

Narendra Modi : अमेरिकेतील गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी भारताविषयी बोलताना अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या विकासाबाबत बोलताना ते म्हणाले की, आता भारताला कोणीही रोखू शकणार नाही. इतकंच नाही तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना चीनचे नेते डेंग शिओपिंग यांच्यासोबत केली आहे. लॉस एंजेलिस येथील यूसीएलए कॅम्पसमधील रॉयस हॉलमध्ये ऑल-इन समिट 2023 मध्ये बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

भारताचा सर्वात उच्च विकासदर असेल

रे डॅलिओ यांनी म्हटले की, “आमच्याकडे भारत आणि जगातील टॉप 20 देशांसाठी 10 वर्षांच्या विकास दराचा अंदाज आहे. भारत उच्च विकास दर कायम ठेवेल अशी शक्यता आहे. माझ्या मते मोदी हे डेंग झियाओपिंग आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात सुधारणा आणि विकास केला आहे.

भारत खूप महत्त्वाचा देश

रे डॅलियो म्हणाले की, “भारत हा खूप महत्त्वाचा आहे. मला वाटत नाही की कोणताही मुद्दा भारताला रोखेल. तटस्थ देश चांगले काम करतात हे आपण इतिहासात पाहिले आहे. त्यांनी युद्धात विजेत्यांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. आज अमेरिकेचा चीन, रशियासोबत संघर्ष आहे. भारतासारखे तटस्थ देश अशा स्थितीचे लाभार्थी असतील.

G-20 मुळे वाढली भारताची प्रतिष्ठा

नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या जी२० संमेलनात भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. भारत आशिया खंडातील सर्वात विश्वासू मित्र देश आहे. आशिया खंडात भारताची पकड वाढली आहे. भारताचे अनेक देशांसोबत चांगले संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जागतिक नेत्यांसोबत असलेली बॉन्डिंग देखील जगाने पाहिली आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या जी-२० संमेलनात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.