AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किम जोंग चौथ्यांदा बाबा होण्याची चर्चा, त्यातच ‘गायब’ पत्नीचं वर्षभरानंतर अचानक दर्शन

किमसोबत री नेहमीच सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावत असे. पण गेल्या वर्षी जानेवारी महिन्यापासून तिचे दर्शन घडले नव्हते. (Kim Jong Un Wife Ri Sol Ju )

किम जोंग चौथ्यांदा बाबा होण्याची चर्चा, त्यातच 'गायब' पत्नीचं वर्षभरानंतर अचानक दर्शन
फोटो सौजन्य - रॉयटर्स
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 4:21 PM

सेऊल : उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) याची पत्नी री सोल जू (Ri Sol Ju) हिने जवळपास वर्षभरानंतर सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली. देशातील मोठ्या सुट्ट्यांच्या काळात री सोल जू पती किम जोंग उन याच्यासोबत संगीत रजनीला उपस्थित राहिली. री सोल हिच्या अनुपस्थितीमुळे तिच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा रंगल्या होत्या. तर काही जणांनी री सोलच्या तब्येतीचं बरंवाईट झाल्याची भीती वर्तवली आहे. (North Korea Kim Jong Un Wife Ri Sol Ju makes first public appearance in a year)

रोडाँग सिनमन (Rodong Sinmun) या सत्ताधारी पक्षाच्या अधिकृत वृत्तपत्राने किम जोंग उन (Kim Jong Un) आणि त्याची पत्नी री सोल जू यांचा फोटो छापला आहे. किमचे दिवंगत पिता किम जोंग इल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कॉन्सर्टचा हा फोटो आहे.

तब्बल वर्षभरानंतर री सोलचे दर्शन

किमसोबत री नेहमीच सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावत असे. पण गेल्या वर्षी जानेवारी महिन्यापासून तिचे दर्शन घडले नव्हते. सुरुवातीला रीचे काही बरेवाईट झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर री गर्भवती असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. मात्र कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रीला बाहेर जाण्यास बंदी घातली होती, अशी माहिती दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेने दिली. री आणि किम यांना तीन अपत्य असल्याची माहिती आहे.

उत्तर कोरिया आपल्या नेत्याभोवतीच्या कोणत्याही माहितीवर कडकपणे नियंत्रण ठेवते. त्यामुळे अमेरिकन गुप्तचर यंत्रणांना माहिती काढणे कठीण जात आहे. किमलाही देशात जवळजवळ एखाद्या दैवताप्रमाणे मानले जाते. वर्षानुवर्षे किम जोंग उन किंवा त्याच्या वडिलांच्या आरोग्याविषयी अनेक चुकीच्या अफवा पसरल्या जात आहेत.

किमच्या प्रकृतीविषयीही उलटसुलट चर्चा

किम जोंग उन याची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात अमेरिकन वृत्तपत्रांनी दिली होती. हृदयविकारासंबंधी शस्त्रक्रियेनंतर त्याच्या प्रकृतीला गंभीर धोका निर्माण झाल्याचा दावा केला जात होता. अतिरिक्त प्रमाणात धूम्रपान, लठ्ठपणा आणि जास्त काम, यामुळे किमला हृदयरोग जडल्याची शक्यता ‘डेली एनके’च्या बातमीत वर्तवली होती. त्याच्यावर ह्यंग्सन प्रांतामधील एका व्हिलामध्ये उपचार सुरु असल्याचा दावाही केला जात होता. किमच्या मृत्यू झाल्याच्या अफवाही उठल्या, मात्र किमने दमदार पुनरागमन करत या अफवांना उत्तर दिलं.

संबंधित बातम्या :

उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उनची प्रकृती चिंताजनक, अमेरिकन वृत्तपत्रांचा दावा

(North Korea Kim Jong Un Wife Ri Sol Ju makes first public appearance in a year)

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.