Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

North korea attack on South korea | उत्तर कोरियाची दक्षिण कोरियावर बॉम्बफेक, जगात तिसऱ्या युद्धाला सुरुवात?

North korea attack on South korea | जगामध्ये आधीपासूनच दोन युद्ध सुरु आहेत. रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास. आता उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामध्ये युद्ध भडकण्याची भिती आहे. उत्तर कोरियाची एक कृती या वादाला कारणीभूत आहे. दक्षिण कोरियाने बेटाजवळील नागरिकांना जागा रिकामी करण्यास सांगितली आहे.

North korea attack on South korea | उत्तर कोरियाची दक्षिण कोरियावर बॉम्बफेक, जगात तिसऱ्या युद्धाला सुरुवात?
North korea attack on South korea
Follow us
| Updated on: Jan 05, 2024 | 12:33 PM

North korea attack on South korea | उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामध्ये मतभेद अजिबात नवीन नाहीत. अनेक शांती करार झाल्यानंतरही दोन्ही देशांमध्ये तणाव कायम आहे. पुन्हा एकदा दोन्ही देशांमध्ये टोकाचा तणाव दिसून आलाय. उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाच्या सीमेवर 200 पेक्षा जास्त तोप गोळे डागले. जगामध्ये आधीपासूनच दोन युद्ध सुरु आहेत. रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास. या युद्धाचा शेवट दिसत नाहीय. आतापर्यंत शांत दिसणारा उत्तर कोरिया आपला सर्वात मोठा शत्रू दक्षिण कोरियाला डोळे दाखवतोय.

दक्षिण कोरियाने शुक्रवारी उत्तर कोरियाई सीमेजवळील योनप्योंग बेटावरील नागरिकांना जागा खाली करण्यासाठी नोटीस दिली आहे. दक्षिण कोरियाच सैन्य या भागात लाइव्ह फायर अभ्यास करणार हे कारण यासाठी देण्यात आलय. काही तासापूर्वी व्हाइट हाऊसने उत्तर कोरियावर आरोप केला. उत्तर कोरियाने रशियाला मिसाइल दिली होती. त्याचा वापर युक्रेनवर हल्ल्यासाठी करण्यात आल्याचा उत्तर कोरियावर आरोप आहे. व्हाइट हाऊसचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी हे वक्तव्य केलं. त्यानंतर उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर 200 पेक्षा अधिक तोपगोळे डागले. दक्षिण कोरियाच यामध्ये काहीही नुकसान झालेलं नाहीय. हे तोपगोळे उत्तर सीमा रेषेजवळ पडले. दोन्ही देशातील ही समुद्री सीमा आहे.

लोकांच्या मनात दहशत

उत्तर कोरियाने 2018 सैन्य कराराच उल्लंघन केलय. वादग्रस्त पश्चिम समुद्र सीमा उत्तरेला पाण्यात 200 राऊंड फायरिंग केली असं दक्षिण कोरियाचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफने म्हटलय. येओनप्योंग बेटाजवळ हे गोळे डागण्यात आले. उत्तर कोरियाचा हा सराव चिथावणी असल्याचे दक्षिण कोरियाने म्हटलय. या अभ्यासात कोणीही जखमी झालं नाही. तिथल्या आसापासच्या लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आलं आहे. दोन्ही देशातील शत्रुत्व कोणापासूनही लपून राहिलेलं नाही. या घटनेनंतर लोकांच्या मनात दहशत दिसून येतेय. युद्धाच आणखी एक मैदान तयार झालय.

1950 साली दोन्ही देशात भयंकर युद्ध

मागच्या 77 वर्षांपासून उत्तर आणि दक्षिण कोरियामध्ये तणाव आहे. दुसऱ्या विश्व युद्धानंतर कोरियाला जापानच्या नियंत्रणपासून वेगळ करण्यात आलं. त्यावेळी अमेरिका आणि सोवियत संघ यांच्या राजकीय डावपेचात हा भाग फसला. परिणामी 1948 मध्ये दोन भाग झाले. 1950 साली दोन्ही देशात भयंकर युद्ध झालं. पण त्यानंतर कटुता मिटलेली नाही.

सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही...
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही....
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ.
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली.
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर.
'मुंडे खोटारडा माणूस, दर दिवशी नवीन बायका..' करूणा शर्मांचा गौप्यस्फोट
'मुंडे खोटारडा माणूस, दर दिवशी नवीन बायका..' करूणा शर्मांचा गौप्यस्फोट.
मोस्ट वॉन्टेड तहव्वूर राणाला अखेर भारतात आणलं
मोस्ट वॉन्टेड तहव्वूर राणाला अखेर भारतात आणलं.
ही सवय खूप घाण, औरंगजेबासोबत मुंडेंची तुलना? करूणा शर्मांचा गंभीर आरोप
ही सवय खूप घाण, औरंगजेबासोबत मुंडेंची तुलना? करूणा शर्मांचा गंभीर आरोप.
एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार कधी? गुणरत्न सदावर्तेंची मोठी माहिती
एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार कधी? गुणरत्न सदावर्तेंची मोठी माहिती.
वाल्मीक कराडने न्यायालयात दाखल केला आपण निर्दोष असल्याचा अर्ज
वाल्मीक कराडने न्यायालयात दाखल केला आपण निर्दोष असल्याचा अर्ज.
...तरच ST कर्मचाऱ्यांचे 100% पगार होणार, MSRTCची इतक्या कोटींची मागणी
...तरच ST कर्मचाऱ्यांचे 100% पगार होणार, MSRTCची इतक्या कोटींची मागणी.