हस्तमैथून करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पंतप्रधानाला तत्काळ द्यावा लागला राजीनामा
खासगी व्हिडीओ समोर आल्यामुळे उत्तर सायप्रस देशाचे पंतप्रधान इरसान सानेर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. ते या व्हिडीओमध्ये हस्तमैथून करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ समोर येताच त्यांनी आपल्या पदाचा त्याग केलाय.
निकोसिया : खासगी व्हिडीओ समोर आल्यामुळे उत्तर सायप्रस देशाचे पंतप्रधान इरसान सानेर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. ते या व्हिडीओमध्ये हस्तमैथून करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ समोर येताच त्यांनी आपल्या पदाचा त्याग केलाय. मात्र हा प्रकार माझ्याविरोधातील कट असल्याचा दावा सानेर यांनी केलाय.
नेमका प्रकार काय आहे ?
मिळालेल्या माहितीनुसार सानेर यांचा एक खासगी व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ते एका तरुणीसोबत दिसत आहेत. तसेच व्हिडीओमध्ये ते हस्तमैथून करताना दिसतायत. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मात्र, व्हायरल होत असलेला व्हिडीओ माझा नसल्याचा दावा सानेर यांनी केलाय.
देशाची, पक्षाची सेवा करण्यापासून रोखलं जातंय
हा व्हिडीओ लीक झाल्यानंतर मला माझ्या देशाची, पक्षाची सेवा करण्यापासून रोखलं जात आहे. मला बदनाम करण्यासाठी असे प्रकार केले जात आहेत, असं सानेर यांनी म्हटलंय. तसेच हा प्रकार म्हणजे माझ्या कुटुंबावर, पक्षावर हल्ला आहे. मी या सर्व प्रकरणावर सल्लागाराशी चर्चा करत आहे, असंदेखील त्यांनी सांगितलं आहे.
सानेर राजकीय दबावाखाली, पक्षाने पाठिंबा काढून घेतला
दरम्यान, उत्तर सायप्रस या देशात मागील काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपासून इरसान सानेर यांच्यावरील राजकीय दबाव वाढला होता. तसेच देशाचे पंतप्रधान असले तरी त्यांच्याच पक्षाने त्यांचा पाठिंबा काढून घेतला होता. अशी परिस्थिती असताना त्यांचा हा व्हिडीओ समोर आला आहे. या सर्व प्रकारामुळे त्यांची राजकीय कारर्कीद संकटात आल्याचं म्हटलं जात आहे.
इतर बातम्या :
आनंद पोटात माझ्या माईना! घरी आलेल्या नव्या पाहूण्याला पाहून कुत्रा खुश
बापरे! विजेच्या तारेला लटकला साप, लोक म्हणतात हा इथं कसा गेला ?
काय सांगता, आचाऱ्याने हातानेच बनवला चिला!, कला पाहून नेटकरीही हैराण
T20 World Cup 2021 : श्रीलंकन संघाला अपयशाची भीती, दिग्गज खेळाडूने सांगितली अंदर की बात#T20WorldCup #SriLanka https://t.co/LHfz7xmimu
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 22, 2021
(northern cyprus pm ersan saner resigned due to private video leak)