Donald Trump: डोनॉल्ड ट्रम्पच्या विजयाने नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी ठरली खरी, भारतासंदर्भात काय म्हटले…

Nostradamus Predictions: जीवनातील शेवटच्या टप्प्यात महाशक्तीचा राजा दुसऱ्यांदा सिंहासन सांभाळणार आहे. त्यानुसार सध्या महाशक्ती अमेरिका आहे.डोनाल्ड ट्रम्प 78 वर्षांचे आहे. ते दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होत आहे.

Donald Trump: डोनॉल्ड ट्रम्पच्या विजयाने नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी ठरली खरी, भारतासंदर्भात काय म्हटले...
Nostradamus Predictions and donald trump
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 10:06 AM

Nostradamus Predictions and US Election result 2024: अमेरिकेत राष्ट्रध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा विजयी झाले आहे. त्यांनी डेमोक्रेटिक पार्टीच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने जगप्रसिद्ध भविष्यवर्ता नास्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाणीची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. फ्रॉन्सच्या या महान भविष्यवर्त्याने शेकडो दशकांपूर्वी जगासंदर्भात अनेक भविष्यवाणी वर्तवल्या होत्या. आता अमेरिकेतील निवडणूकही नास्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाणीमुळे चर्चेत आली आहे. 1555 मध्ये ‘The Prophecies’ (Les Prophéties) नावाचे नास्ट्रॅडॅमस यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले होते. त्यात नास्ट्रॅडॅमस यांनी 1503 च्या जवळपास लिहून ठेवलेले भविष्य आहे. या पुस्तकात भारतासह जगातील अनेक देशांसंदर्भात भविष्य वर्तवले आहे. आता ट्रम्प यांच्या विजयासंदर्भात नेमके नास्ट्रॅडॅमस यांनी काय म्हटले होते…

असे होते अमेरिकेचे भविष्य

‘The Prophecies’ पुस्तकात नास्ट्रॅडॅमसने जागतिक महाशक्तीचा उल्लेख केला आहे. त्यात म्हटले आहे की, जीवनातील शेवटच्या टप्प्यात महाशक्तीचा राजा दुसऱ्यांदा सिंहासन सांभाळणार आहे. त्यानुसार सध्या महाशक्ती अमेरिका आहे. डोनाल्ड ट्रम्प 78 वर्षांचे आहे. ते दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होत आहे. यामुळे ही भविष्यवाणी अमेरिकातील निवडणुकीसंदर्भातील असल्याचे स्पष्ट होत आहे.

भारतासंदर्भात काय म्हटले…

  1. नास्ट्रॅडॅमसने आपल्या भविष्यवाणीत भौगोलिक संकेत देत भारतासंदर्भात वक्तव्य केले आहे. त्यानुसार भारतात एका मुक्तीदाता जन्म घेणार आहे. तो राजकारणासोबत धर्माच्या क्षेत्रात सक्रीय असणार आहे. तो अनेक महान कार्य करणार आहे. त्या मुक्तीदातामुळे वंचितांची समस्या दूर होईल. अनेक मोठे संकट टळणार आहे.
  2. नास्ट्रॅडॅमसने तिसऱ्या महायुद्धासंदर्भात म्हटले आहे. तिसऱ्या महायुद्धात जगातील अनेक देश सहभागी होतील. हिंदमधील प्रचीन देश (भारत) या महायुद्धात संघर्ष करताना दिसणार आहे.
  3. नास्ट्रॅडॅमसने बहुधर्म असणाऱ्या देशाचा उल्लेख केला आहे. त्यानुसार हा देश भारत आहे. या देशात सांप्रदायिक कट्टरता वाढणार आहे. लोकांमध्ये धर्मावरुन संघर्ष होणार आहे. त्याचे भीषण परिणाम होणार आहे.
  4. नास्ट्रॅडॅमसने विभिन्न ऋतू असणाऱ्या देशाचा उल्लेख केला आहे. त्यानुसार जगात असा देश भारत आहे. त्या देशात उष्णता इतकी वाढेल की पृथ्वी गरम होईल. त्याचबरोबर थंडीच्या मोसमात हाडांना गारवा देणारे थंड वारे वाहतील. आता नॉस्ट्रॅडॅमसचे भविष्य कितपत खरे ठरतील हे केवळ येणार काळच सांगेल.
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.