Afghanistan Crisis: NSA ची दिल्लीत बैठक, सात देश सहभागी; “मला विश्वास आहे अफगानिस्तानच्या लोकांना मदत होईल”- अजीत डोभाल
या बैठकीत अफगाणिस्तानातील दहशतवाद आणि सीमेपलीकडील दहशतवादावर यावर चर्चा होणार आहे. याशिवाय, सहभागी युद्धग्रस्त देशातील वाढती कट्टरता यावरही NSA चर्चा करणार आहे. तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यापासून अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ले वाढले आहेत.
नवी दिल्लीः आज भारताने आयोजीत केलेली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) स्थरावरची अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बैठक आहे. दिल्लीत ही बैठक भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल (Ajit Doval) यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. एकूण सात देश- इराण, रशिया, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान आणि किर्गिस्तान या बैठकीत सहभागी आहेत. या बैठकीत, संबंधित देशांचे सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी, शांतता आणि स्थैर्याला चालना देण्यासाठी आणि अफगाणिस्तानच्या लोकांना पाठिंबा देण्याच्या उपायांवर चर्चा केली जाईल, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. (NSA level meeting in Delhi on Afghanistan crisis)
या बैठकीत अफगाणिस्तानातील दहशतवाद आणि सीमेपलीकडील दहशतवादावर यावर चर्चा होणार आहे. याशिवाय, सहभागी युद्धग्रस्त देशातील वाढती कट्टरता यावरही NSA चर्चा करणार आहे. तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यापासून अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ले वाढले आहेत. या बैठकीत, रेडीकलाईजेशनच्या संभाव्यतेवर काय उपाय असू शकतो, ही व्यावहारिक रणनीती तयार करू शकते.
It is a privilege for India to host this dialogue today. We have been keenly watching the developments in Afghanistan. These have important implications not only for the people of Afghanistan but also for its neighbours and the region: NSA Ajit Doval pic.twitter.com/l1W2x3IqvV
— ANI (@ANI) November 10, 2021
अजीत डोभाल यांनी सांगितले, “आमच्या सगण्यांचं अफगानिस्तानमध्ये होणाऱ्या घटनांकडे लक्ष आहे. या घटना अफगाणिस्तानच्या लोकांसाठी केवळ नाही तर पुर्ण देश आणि जगासाठी महत्वाच्या आहेत. ते म्हणाले, मला विश्वास आहे की आमचे विचार-विमर्श प्रोडक्टीव व उपयोगी बनतील आणि अफगानिस्तानच्या लोकांना मदत होईल.
बैठकीदरम्यान, भारत अफगाणिस्तानमधील अलीकडील घडामोडींमुळे उद्भवलेल्या प्रदेशातील सुरक्षा परिस्थितीचा पण आढावा घेतील, असे परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) आधी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते. भारताने पारंपारिकपणे अफगाणिस्तानच्या लोकांशी जवळचे आणि मैत्रीपूर्ण संबंध ठेवले आहेत आणि अफगाणिस्तानसमोरील सुरक्षा आणि मानवतावादी आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्रित आंतरराष्ट्रीय प्रतिसादाची मागणी केली आहे. संवाद हे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे, असे MEA ने म्हटले आहे.
इराणने यापूर्वी अशाच स्वरूपातील बैठकीचे आयोजन केले होते. 2018 आणि 2019 मध्ये तेहरानने सुरू केलेल्या फॉर्मेटचं हे पुढचं पाऊल आहे.
Other News