Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशमध्ये हिंदूंची संख्या घटली, पाहा आता देशात किती हिंदू उरलेत?

बांगलादेशात हिंदूंवर आजही हल्ले सुरू आहेत. जमावाने येऊन लोकं हिंदूंची घरे, दुकाने आणि मंदिरे यांना लक्ष्य करत आहेत. बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांवर भारताने देखील बांगलादेशमधील सरकारला याबाबत योग्य ती पाऊलं उचलण्याची आणि हिंदूची सुरक्षा सुनिश्चित करण्याची सूचना केली आहे.

बांगलादेशमध्ये हिंदूंची संख्या घटली, पाहा आता देशात किती हिंदू उरलेत?
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 9:39 PM

बांगलादेशमध्ये ५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर त्यांना देश सोडून जावे लागले. त्यानंतर हिंदूंवरील हल्ल्यांमध्ये वाढ होत गेली. गेल्या काही महिन्यांत हिंदूंच्या घरांवर, दुकानांवर आणि मंदिरांवर हल्ले होत आहेत. शेकडो हिंदू लोकांच्या हत्या झाल्या आहेत. पण पोलीस प्रशासन देखील यात अपयशी ठरलं आहे. बांगलादेशी हिंदूंनी स्वत:साठी संरक्षण मागितले तेव्हा त्यांच्या नेत्यांना खोट्या खटल्यात अडकवण्यात आले. हिंदूंच्या समर्थकांवर हल्ले झाले. हिंदू नेते चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. सध्या बांगलादेशातील हिंदूंची स्थिती काय आहे ते जाणून घेऊयात.

बांगलादेशच्या 2022 च्या जनगणनेनुसार देशात लोकसंख्येच्या 7.96% आहेत हिंदू आहेत. इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार इतर अल्पसंख्याक (बौद्ध, ख्रिश्चन इ.) मिळून 1% पेक्षा कमी आहेत. बांगलादेशची लोकसंख्या 165.16 दशलक्ष आहे. ज्यात 91.08% मुस्लीम आहेत.

आधी हिंदूंची एक मोठी लोकसंख्या बांगलादेशमध्ये राहत होती. पण गेल्या काही वर्षामध्ये ती मोठ्या प्रमाणात कमी होत गेली. लोकसंख्येपैकी सुमारे एक तृतीयांश लोकं येथे आधी हिंदू होते. पण नंतर मुस्लिमांची लोकसंख्या सतत वाढत गेली आणि हिंदूंची लोकसंख्या कमी होत गेली. 1901 पासून बांगलादेशातील लोकसंख्येतील हिंदूंची संख्या कमी झाल्याचे दिसून आले. ही घट 1941 आणि 1974 च्या जनगणनेदरम्यान सर्वात जास्त होती, म्हणजे जेव्हा बांगलादेश पूर्व पाकिस्तान होता.

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, फाळणीनंतरही हा ट्रेंड कायम होता. मोठ्या संख्येने हिंदू बांगलादेश सोडून भारतात आले. मुस्लिमांचा एकूण वैवाहिक प्रजनन दर प्रति स्त्री 7.6 मुले होता, तर हिंदूंचा हा दर 5.6 होता. द मिलबँक मेमोरियल फंड त्रैमासिक मासिकात हा शोधनिबंध प्रकाशित झाला होता.

बंगाल आणि पंजाब हे ब्रिटिश भारतातील दोन प्रांत होते जे भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागले गेले. ही फाळणी अव्यवस्थित होती. त्यामुळे हिंसाचार वाढला. पंजाब प्रमाणे 1947 मध्ये बंगालमध्ये नवीन सीमा ओलांडून लोकसंख्येची मोठी देवाणघेवाण झाली नाही. फाळणीनंतर 11.4 दशलक्ष हिंदू पूर्व बंगालमध्ये राहिले. 947 मध्ये, केवळ 344,000 हिंदू निर्वासित पश्चिम बंगालमध्ये आले आणि पूर्व पाकिस्तानमधील अल्पसंख्याक तेथे शांततेने राहू शकतील अशी आशा बाळगून राहिले.”

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.