Journalist Murder: पत्रकाराचं डोकं कलम करणारा दहशतवादी पाकिस्तानचा पाहुणा, अमेरिकेने लाथाडलं

अमेरिकी पत्रकार डेनियल पर्ल (Daniel Pearl Murder Case) याचं शिर धडापासून वेगळं करत हत्या करणाऱ्या अल कायदाच्या (al qaeda) दहशतवाद्याला पाकिस्तान पाठिशी घालत असल्याचा आरोप होतोय.

Journalist Murder: पत्रकाराचं डोकं कलम करणारा दहशतवादी पाकिस्तानचा पाहुणा, अमेरिकेने लाथाडलं
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 5:26 PM

इस्लामाबाद : अमेरिकी पत्रकार डेनियल पर्ल (Daniel Pearl Murder Case) याचं शिर धडापासून वेगळं करत हत्या करणाऱ्या अल कायदाच्या (al qaeda) दहशतवाद्याला पाकिस्तान पाठिशी घालत असल्याचा आरोप होतोय. यावरुन अमेरिकेने देखील पाकिस्तानला चांगलंच लाथाडलं आहे. पाकिस्तानमधील न्यायालयाने या आरोपीला सोडून देण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे जगभरातून टीकेची झोड उठलीय. अमेरिकेने कठोर भूमिका घेतल्यानंतर आता पाकिस्तानने (Pakistan) पत्रकार पर्लची हत्या करणाऱ्या दहशतवादी उमर शेखविरोधात (Omar Sheikh) करण्यासाठी पावलं उचलली आहेत. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने ब्रिटनमध्ये जन्म झालेला आरोपी उमर शेख सईदला तुरुंगातून सरकारी गेस्ट हाऊसमध्ये नजरकैद (House Arrest) ठेवण्याचे आदेश दिलेत (Omar Sheikh Accused terrorist in Daniel Pearl murder case will be under house arrest in Pakistan).

उमर शेख सईदवर 2002 मध्ये अमेरिकेचे पत्रकार डॅनियल पर्ल यांचं अपहरण करुन हत्या केल्याचा आरोप आहे. याच आरोपाखाली आरोपी उमर मागील 18 वर्षांपासून तुरुंगात होता. मागील वर्षी पाकिस्तानमधील न्यायालयाने त्याला मुक्त केलं. आता त्याला तुरुंगाच्या रेस्ट हाऊसमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. उमर शेखला सोडून देण्याच्या निर्णयावर अमेरिकेने तीव्र नाराजी व्यक्त केलीय. यानंतर पाकिस्तान सरकारने न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली. सिंध प्रांत सरकारने उमरला सोडून देण्याच्या निर्णयाला आव्हान दिलंय. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उमरला तुरुंगातून रेस्ट हाऊसमध्ये हलवण्याचे आदेश दिलेत. उमर शेख नजरकैदेत असताना त्याला आपल्या कुटुंबीयांना भेटता येणार आहे. या काळात त्याला मोबाईल फोन किंवा इंटरनेट वापरण्यास मात्र बंदी असले.

अमेरिकी पत्रकाराचं कराचीतून अपहरण

डेनियल पर्ल (Daniel Pearl Murder Case) अमेरिकेच्या ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये दक्षिण आशिया ब्युरो चीफ होता. जानेवारी 2002 मध्ये त्याचं दहशतवाद्यांनी अपहरण केलं. काही दिवसांनंतर पर्ल यांचं शिर धडापासून वेगळं करुन हत्या करण्यात आली. पर्ल मुस्लीम दहशतवादावर अभ्यास करत होते. या प्रकरणी उमर शेख मुख्य आरोपी आहे. सिंध न्यायालयाने एप्रिल 2020 मध्ये त्याला 7 वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र त्याने आधीच 18 वर्षे तुरुंगात काढल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्याची मुक्तता केली.

कुटुंबाकडून आरोपी उमरला या प्रकरणात अडकवल्याचा आरोप

आरोपी उमर शेखच्या कुटुंबाने त्याला या प्रकरणात अडकवल्याचा आरोप केलाय. दुसरीकडे डेनियल पर्लच्या (Daniel Pearl Murder Case) कुटुंबाने नेमलेल्या वकिलाने दावा केलाय की पर्लच्या हत्येत उमर मुख्य सूत्रधार होता.

हेही वाचा :

पाकिस्तानमध्ये महागाईचा कहर, शहरांनंतर आता गावही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

मुलींना टाईट जीन्स, हायहिल्स घालण्यास बंदी; पाकिस्तानमधील विद्यापीठाचा गजब कारभार

पाकिस्तानच्या तुलनेत भारतात भ्रष्टाचार कमीच, पण 2 वर्षात टेबलाखालून बरीच देवाणघेवाण!

व्हिडीओ पाहा :

Omar Sheikh Accused terrorist in Daniel Pearl murder case will be under house arrest in Pakistan

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.