Donald Trump : सुनीता विल्यम्स यांना ओव्हरटाइम देण्याच्या प्रश्नावर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच मन जिंकणार उत्तर
Donald Trump : आठवड्याभराच्या मिशनसाठी आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर गेलेल्या सुनीता विल्यम्स यांना 278 अतिरिक्त दिवस अंतराळात काढावे लागले. त्यांना ओव्हरटाइम देणार का? या प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प यांनी सुंदर उत्तर दिलं.

आठवड्याभराच्या मिशनसाठी आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर गेलेल्या अवकाशवीर सुनीता विल्यम्स नऊ महिने तिथे अडकून पडल्या होत्या. मागच्या आठवड्यात सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे स्पेसएक्सच्या यानाने पृथ्वीवर परतले. फ्लोरिडाच्या समुद्रात स्पेसएक्सच्या कॅप्सूलन स्पॅलश लँडिंग केलं. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे सुरक्षित पृथ्वीवर परतल्यानंतर पत्रकार परिषदेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सुंदर उत्तर दिलं. व्हाइट हाऊस येथे एका पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांना, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोघांनी अंतराळात ओव्हरटाइम केला. त्याचे त्यांना पैसे मिळणार का? असा प्रश्न विचारला.
त्यावर ट्रम्प म्हणाले की, “कोणी माझ्याबरोबर या विषयी बोललं नाही. पण आवश्यकता पडल्यास मी माझ्या खिशातून पैसे देईन” विलियम्स आणि विलमोर जून 2024 मध्ये एका आठवड्याच्या मिशनसाठी आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर गेले होते. पण बोइंग स्पेसक्राफ्टमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांना 278 अतिरिक्त दिवस अंतराळात काढावे लागले. नासाच्या नियमानुसार विलियम्स आणि विल्मोर या दोघांना अवकाशात घालवलेल्या अतिरिक्त वेळेसाठी कोणतही वेतन मिळणार नाही. अमेरिकन अंतराळवीर सरकारी कर्मचारी असतात. त्यांना फिक्स वेतन मिळतं. भले, तिथे कितीही दिवस रहावं लागलं. त्यांच्यासाठी प्रवास, भोजन आणि निवासाची व्यवस्था नासाकडून केली जाते.
त्यांनी जे झेललं, त्याच्यासाठी हे कमीच
नासाकडून त्यांना दिवसाच एक किरकोळ भत्ता दिला जातो. जो प्रतिदिवस 5 डॉलर 430 रुपये असतो. त्या हिशोबाने सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर यांना केवळ 1430 डॉलर (1,22,980.50 रुपये) मिळणार. जेव्हा हा आकडा ट्रम्प यांच्यासमोर ठेवला, तेव्हा त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. ‘बस इतकच? त्यांनी जे झेललं, त्याच्यासाठी हे कमीच आहे’ असं ट्रम्प म्हणाले.
सुनीता विलियम्स यांचा पगार किती?
नासाचे अंतराळवीर आठवड्याला 40 तास काम करतात. पण त्यांना ओव्हरटाइम, वीकेंड आणि हॉलिडेचे पैसे मिळत नाहीत. एका रिपोर्टनुसार सुनीता विलियम्स GS-15 लेवलची कर्मचारी आहे. तिची वार्षिक सॅलरी 1,52,258 डॉलर (1.30 कोटी रुपये) आहे. यात आरोग्य विमा आणि निवास भत्ता सुद्धा येतो.