‘आमचे संबंध असे आहेत की आम्हाला अनुवादकाची गरज नाही’ मोदींसोबतच्या भेटीवर पुतिन काय म्हणाले
पीएम नरेंद्र मोदी यांच्या सोबतच्या द्विपक्षीय भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील घनिष्ठ संबंधांचा उल्लेख करताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी असे काही बोलले की भारतीय पंतप्रधानांना हसू आवरता आले नाही.
ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर गेले आहेत. आज मंगळवारी रशियाच्या कझान शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाला. 23 ऑक्टोबर रोजी ब्रिक्स शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे. त्याआधी ही बैठक झाली. पंतप्रधान मोदी यांचे रशियात जोरदार स्वागत करण्यात आले. यादरम्यान भारत आणि रशिया यांच्यातील ऐतिहासिक संबंधांचा उल्लेख करताना पुतिन यांनी असे काही बोलले की, ज्यामुळे पंतप्रधान मोदी देखील हसले.
द्विपक्षीय चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी हे हिंदी तर राष्ट्राध्यक्ष पुतिन हे रशियन भाषेत बोलत होते. यावेळी दोन्ही नेत्यांच्या शब्दांचे रशियन आणि हिंदीमध्ये भाषांतर करण्यासाठी अनुवादक उपस्थित होते. यादरम्यान, पीएम मोदींसोबत बोलताना राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले की, ‘भारत आणि रशियामधील संबंध इतके खोल आहेत की मला वाटते की भाषांतरकाराच्या मदतीशिवायही तुम्ही माझे शब्द समजू शकता.’
व्लादिमीर पुतिन म्हणाले की, मॉस्को आणि नवी दिल्ली यांच्यातील संबंध अतिशय खास आहेत. काळाबरोबर ते अधिक घट्ट झालेत. पीएम मोदी म्हणाले की, ‘गेल्या तीन महिन्यांतील माझा रशियाचा हा दुसरा दौरा आहे, यातून दोन्ही देशांमधील सखोल भागीदारी आणि मैत्री दिसून येते.’ पीएम मोदी जुलैमध्ये ही रशियाला गेले होते.
भारत हा रशियाचा सर्वात विश्वासू मित्र आहे. रशियाच्या आर्थिक विकासात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पीएम मोदींसोबतच्या त्यांच्या मागील भेटीचा संदर्भ देत पुतिन म्हणाले की, ‘मला आठवते की जुलैमध्ये आमची भेट झाली जेव्हा आमच्यात अनेक मुद्द्यांवर चांगली चर्चा झाली होती आणि त्यानंतर आम्ही अनेक वेळा फोनवर बोललो. कझानला येण्याचे माझे आमंत्रण स्वीकारल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे.
पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा युद्धाबाबत भारताची भूमिका जाहीर केली. पुतीन यांना सांगितले की, ‘रशिया-युक्रेन संघर्ष शांततेने सोडवला गेला पाहिजे आणि त्यासाठी भारत सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या मुद्द्यावर आम्ही सतत संपर्कात आहोत. ही समस्या शांततेने सोडवले पाहिजेत. आम्ही शांतता स्थापित करण्यास पूर्णपणे समर्थन देतो. भारत नेहमीच मानवतेला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतो.