Pakistan : महागाईने बेजार PoK मधील जनतेला हवा भारतात समावेश
पाकिस्तानमधील जनतेला भारतात समावेश हवा आहे. गिलगिट बाल्टिस्थामध्ये जनतेला भारतातील लडाखमध्ये विलिनीकरण हवे आहे. पाकिस्तानकडून या भागातील जनतेला सापत्न वागणूक मिळत आहे. यामुळे जनता पाकिस्तानच्या विरोधात रस्त्यावर उतरतली आहे.
लाहोर : पाकिस्तान (pakistan)व्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या गिलगिट-बाल्टिस्थानमध्ये पाकिस्तानच्या विरोधात आंदोलन (protest in pakistan)पेटलं आहे. या भागातील जनतेला भारतात समावेश हवा आहे. गिलगिट बाल्टिस्थामध्ये जनतेला भारतातील लडाखमध्ये विलिनीकरण हवे आहे. पाकिस्तानकडून या भागातील जनतेला सापत्न वागणूक मिळत आहे. यामुळे जनता पाकिस्तानच्या विरोधात रस्त्यावर उतरतली आहे. सोशल मीडियावर गिलगिट बाल्टिस्थानमधील जनतेचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहे. त्यात जनता लडाखमध्ये राहण्यासाठी सकरदू कारगिल रोड उघडण्याची मागणी करत आहे. पाकिस्तान सरकार आमच्या जमिनी अनधिकृत ताब्यात घेतल्या आहेत, असा आरोपही होत आहे. तसेच पाकिस्तानत असलेल्या प्रचंड महागाईमुळे जनता आपल्या गरजेचा वस्तू खरेदी करु शकत नाही.
पाकिस्तान सेनेकडून जमिती ताब्यात गिलगिट-बाल्टिस्थानमध्ये पाकिस्तान सेनेत जनतेच्या जमिनीचा ताबा घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जनता पाकिस्तानविरोधात यासंदर्भात लढा देत आहे. पाकिस्तान सरकार या जमिनी प्रशासनाच्या असल्याचा दावा करत आहे.
Gilgit Baltistan protests against their oppressors.pic.twitter.com/EpzieUPpzN
— مہروز (@DazzlinMehroz) January 9, 2023
आंदोलनाशी चीन कनेक्शन पाकिस्तान सरकारने चीनकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले आहे. या कर्जापोटी पाकिस्तान चीनला हुंजा घाटीचा भाग देणार असल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे चीनी कर्जातून पाकिस्तानला सुटका मिळेल. चीनला या जागेचा वापर चीन-पाकिस्तान कॅरीडोरसाठी करुन घ्यायचा आहे.
Ppl in #GilgitBaltistan chant slogans for REUNIFICATION with #Ladakh & demand opening of #Kargil – #Skardu road. Ppl always resisted #Pakistani moves to make #POJK a province of #Pakistan, but #India has always accommodated Pakistan on #JammuAndKashmir ignoring public sentiments. pic.twitter.com/a5x66Qf1nx
— Prof. Sajjad Raja (@NEP_JKGBL) January 7, 2023
पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली आहे. पाकिस्तानातील जनतेला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत नाही. महागाई प्रचंड वाढली आहे. आटा १६०, साखर १०० रुपये किलो मिळत आहे. पाकिस्तानच्या परदेशी चलनाचा साठा गेल्या महिन्यात 294 मिलियन डॉलरने कमी होऊन 5.8 अब्ज डॉलरवर आला आहे. इतर देशांचं कर्ज फेडता येत नसल्याने पाकिस्तानवर ही परिस्थिती ओढवली आहे. पाकिस्तानने भारताशी व्यापारीक नाते तोडल्यामुळे त्यांची ही परिस्थिती निर्माण झाली आहे.