पाकिस्तान-अफगानिस्तानमध्ये तणाव वाढला, कुठल्या पातळीपर्यंत जाणार दोन्ही देशांमधला संघर्ष?

तालिबानने अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात डांगम भागात पाकिस्तानी सीमेजवळ नवीन चौक्या निर्माण केल्या. पाकिस्तानी सैन्यावर दबाव टाकण्यासाठी या सैन्य चौक्यांची निर्मिती करण्यात आलीय.

पाकिस्तान-अफगानिस्तानमध्ये तणाव वाढला, कुठल्या पातळीपर्यंत जाणार दोन्ही देशांमधला संघर्ष?
pakistan afghanistan border conflict
Follow us
| Updated on: Sep 11, 2024 | 11:20 AM

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सीमावाद वाढत चालला आहे. मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य आणि तालिबानमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. तालिबानने डूरंड लाइनजवळ नवीन सैन्य चौक्या स्थापन केल्या आहेत. या चौक्यांच्या माध्यमातून तालिबान पाकिस्तानी सैन्याला चिथावणी देत आहे. मंगळवारी सकाळी तालिबानने अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात डांगम भागात पाकिस्तानी सीमेजवळ नवीन चौक्या निर्माण केल्या. पाकिस्तानी सैन्यावर दबाव टाकण्यासाठी या सैन्य चौक्यांची निर्मिती करण्यात आलीय. याआधी सुद्धा मागच्या काही दिवसात तालिबान आणि पाकिस्तानात सैन्यात झडपा झाल्या आहेत.

या तणावादरम्यान अशांत खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या सीमा भागात पाकिस्तानी सैन्यासोबत हिंसक झडप झाली. यात दोन प्रमुख कमांडरसह आठ अफगाण तालिबानी मारले गेले. खुर्रम सीमावर्ती जिल्ह्यात झालेल्या गोळीबारात 16 अफगाणि तालिबानी सैनिक जखमी झाले. डॉन वर्तमानपत्रानुसार, अफगाण तालिबानने 7 सप्टेंबरला सकाळी पाक-अफगाणिस्तान सीमेवर पालोसिन क्षेत्रात बऱ्याच मोठ्या शस्त्रसाठ्यासह पाकिस्तानी चेकपोस्टवर हल्ला केला.

दोन्ही बाजूचे लोक जखमी

2021 मध्ये अनेकवेळा सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला आहे. यात दोन्ही बाजूचे लोक जखमी झालेत. रिपोर्ट्सनुसार, सीमेवर झालेल्या चकमकीत तालिबानचे 8 फायटर मारले गेले. 16 जखमी झाले. तालिबानचे दोन प्रमुख कमांडर खलील आणि जान मोहम्मद यांचा गोळीबारात मृत्यू झाला. रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानी सैन्याचा कमांडर मुहम्मद अली डूरंड लाइनवरील हिंसाचारात मारला गेला. 3 सैनिक जखमी झाले.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.