Pakistan airbase attack | पाकिस्तानात एअरबेसमध्ये घुसले दहशतवादी, 3 फायटर जेट्स जाळले, Airforce स्टेशनवर मोठा हल्ला
Pakistan airbase attack | पाकिस्तानता एअरफोर्स स्टेशनवर मोठा हल्ला झालाय. दहशतवाद्यांनी पाकिस्तानी एअर फोर्सची थेट 3 फायटर जेट्स जाळून टाकली आहे.
लाहोर : पाकिस्तानच्या मियांवली एअरबेसवर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवादी एअरबेसवर घुसले आहेत. भीषण गोळीबार सुरु आहे. संपूर्ण शहरात भय आणि दहशतीच वातावरण आहे. तहरीक ए जिहाद पाकिस्तानने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. रात्री 2 वाजता पंजाब प्रांतातील मियांवली एअरबेसवर हा दहशतवादी हल्ला झाला. “आमचे आत्मघातकी दहशतवादी मियांवली एअरबेसमध्ये घुसले. त्यांनी अनेक छोटी-मोठी विमान नष्ट केली. अनेक पाकिस्तानी सैनिक आणि पायलट यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या दहशतवाद्यांनी पाकिस्तानी एअर फोर्सची तीन फायटर जेट्स जाळली आहेत.
दहशतवाद्यांनी अनेक विमान नष्ट केली आहेत. एअरबेसच्या भिंतीवर फेन्सिंग होती. ती फेन्सिंग कापून हे दहशतवादी आतमध्ये घुसले. पाकिस्तानी सैन्याकडून या एअरबसेवर ऑपरेशन सुरु आहे. पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत आतापर्यंत 4 दहशतवादी मारले गेले आहेत. एअरबेसच्या आतामध्ये फायरिंग आणि स्फोटाचे आवाज ऐकू येत आहेत.
कधी झाला इतका भीषण दहशतवादी हल्ला?
या दहशतवाद्यांनी 3 फायटर जेट्सच नुकसान केलय. पाकिस्तान सरकारकडून आतापर्यंत ही अधिकृत माहिती देण्यात आलीय. हल्ल्यानंतर आस-पासच्या भागात हाय अलर्ट देण्यात आलाय. एअरबेसच्या आसापासचे शाळा-कॉलेजेस बंद करण्यात आले आहेत. दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरु आहे. एअरबेसवर हल्ला पहाटेच्या सुमारास झाला. खबरदारी म्हणून पाकिस्तानच्या सर्व एअर बेसवर अलर्ट जारी करण्यात आलाय.
एअर बेसवर हल्ल्याच्या एक दिवस आधी काय घडलेलं?
एअर बेसवर हल्ला होण्याच्या एकदिवस आधी 3 नोव्हेंबरला बलूचिस्तानच्या ग्वादरमध्ये पाकिस्तानी सुरक्षा पथकाच्या वाहनाांना लक्ष्य करण्यात आलं होतं. या हल्ल्यात 14 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला होता. रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानी सैनिकांचा ताफा ग्वादर जिल्ह्याच्या पसनीपासून ओरमारा येथे चालला होता, त्यावेळी हा दहशतवादी हल्ला झाला. इमरान खान यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या पक्षाच्या समर्थकांनी याच मियांवाली एअरबेसवर हल्ला केला होता. इमरान खानच्या समर्थकांनी एअरबेसच्या बाहेर असलेल्या विमानाच्या एका ढाचाला आग लावली होती.