Air Strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तानात घुसून Air Strike, घनिष्ठ मैत्री शत्रुत्वात बदलली
Air Strike : कधी काळी पाकिस्तान आणि अफगाण तालिबानची एकदम घनिष्ठ मैत्री होती. पण आता ही मैत्री शत्रुत्वात बदलत चालली आहे. पाकिस्तानने काल रात्री अफगाणिस्तानात मोठा Air Strike केला आहे. यामागची काय कारण आहेत, ते जाणून घ्या.
अफगाणिस्तानची तालिबानी राजवट आणि पाकिस्तान यांच्यात तीन वर्षापूर्वीपर्यंत घनिष्ठ मैत्री होती. अफगाणिस्तानातून अमेरिका काढता पाय घेत असताना तिथलं हमीद करजई यांचं सरकार उलथवण्यात पाकिस्तानच्या ISI ने महत्त्वाची भूमिका बजावली होती तसच भारत विरोधी दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानने नेहमीच तालिबानची मदत घेतली. पण अफगाणिस्तानात तालिबानची राजवट सुरु झाल्यानंतर आता ही मैत्री शत्रुत्वात बदलली आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानात घुसून एअर स्ट्राइक केला आहे. अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील बरमल जिल्ह्यात पाकिस्तानने हवाई हल्ले केले. या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार मंगळवारी रात्री लामनसह सात गावांना निशाणा बनवण्यात आलं. तिथे एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाला. स्थानिक सूत्रांनुसार पाकिस्तानने हल्ल्यासाठी फायटर जेट्सचा वापर केला. रिपोर्टमधून जे संकेत मिळतायत त्यानुसार, बरमलमध्ये मुर्ग बाजार गाव नष्ट झालं. हवाई हल्ल्यात अनेक नागरिक गंभीर जखमी झालेत. व्यापक विनाश झालाय. या हल्ल्याने दोन्ही देशातील तणाव आणखी वाढला आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अधिकृरित्या हवाई हल्ल्याची पृष्टी केलेली नाही. टारगेट केलेल्या लोकांमध्ये वजीरिस्तानातून आलेले शरणार्थी सुद्धा आहेत.
पाकिस्तानने हल्ला का केला?
पाकिस्तान तालिबान म्हणजेच तहरीक-ए-तालिबानने अलीकडच्या महिन्यात पाकिस्तानी सैन्यावरील हल्ले वाढवले आहेत. पाकिस्तानने अफगाण तालिबानवर या दहशतवाद्यांना शरण दिल्याचा आरोप केलाय. तालिबान संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्ला ख्वारजमी यांनी पाकिस्तानचे हे आरोप फेटाळून लावले. एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलय की, जे नागरिक हवाई हल्ल्यात मारले गेले, त्यात वजीरिस्तानी शरणार्थींची संख्या जास्त आहे.
मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
प्रवक्ते इनायतुल्ला ख्वारजमी म्हणाले की, “या पाकिस्तानी हल्ल्यात अनेक बालकं आणि नागरिकांचा मृत्यू झाला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि मुलांसह कमीत कमी 15 मृतदेह मिळाले आहेत. शोध मोहिम सुरु आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे”
ते वजीरिस्तानी शरणार्थी
पाकिस्तानच्या कबायली भागातील सैन्य अभियानामुळे जे लोक विस्थापित झाले ते वजीरिस्तानी शरणार्थी आहेत. टीटीपी कमांडर आणि दहशतवादी अफगाणिस्तानात पळून गेले असं पाकिस्तानच म्हणणं आहे. तिथल्या सीमावर्ती भागात अफगाणिस्तान तालिबान त्यांचं संरक्षण करत असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. अफगाणिस्तान, तहरीक-ए-तालिबानच्या दहशतवाद्यांना आश्रय देत असल्यामुळे मागच्या काही काळापासून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे.