कारगिल युद्धात आमचा हात होता, पाकिस्तानी सैन्याने पहिल्यांदाच दिली कबूली

कारगिल युद्ध ही भारतीयांसाठी मोठा धक्का होता, एकीकडे तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला असताना दुसरीकडे लष्कर प्रमुख मुशरर्फ यांनी पाकिस्तानी फौजा घुसवल्या होत्या.

कारगिल युद्धात आमचा हात होता, पाकिस्तानी सैन्याने पहिल्यांदाच दिली कबूली
kargil war 1999
Follow us
| Updated on: Sep 08, 2024 | 1:01 AM

पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी शनिवारी राष्ट्रीय संरक्षण दिवस निमित्त झालेल्या एका कार्यक्रमात सार्वजनिक पातळीवर प्रथमच पाकिस्तानी सैन्याने कारगिर युद्धात सहभाग घेतल्याची कबूली दिली आहे. यापूर्वी पाकिस्तानने केव्हाच कारगिल युद्धात आपला सहभाग असल्याचे मान्य केलेले नव्हते. संरक्षण दिवसाच्या भाषणात पाकचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी ही कबूली दिली आहे.

कारगिल युद्धात पाकिस्तानचा सहभाग होता तरीही भारताने आपले अडीच हजाराहून अधिक सैनिक हकनाक गमावून भारतीय वायू सेनेला आंतरराष्ट्रीय सीमा रेषा न ओलांडू न देता पाकिस्तानी सैन्याचे अड्डे उद्धवस्थ करीत हे युद्ध जिंकले होते. या कारगिल युद्धाला भारतीय ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

याआधी हा संघर्ष कश्मीरी स्वातंत्र्य सैनिकांचा असे म्हटले होते

पाकिस्तानी सैन्याने कारगिल युद्धात आपला सहभाग असल्याचे कधीही मान्य केले नव्हते. लढाई मे आणि जुलै 1999 मध्ये काश्मीरला लागून असलेल्या लडाख शेजारील कारगिलच्या खोऱ्यात झाली होती. या संघर्षात इस्लामाबादच्या अधिकाऱ्यांनी घुसखोरांना काश्मीरचे स्वांतत्र्य सैनिक वा मुजाहिदीन म्हटले होते. पाकिस्तानी सैन्य केवळ येथे गस्त घालत होते. जनरल मुनीर यांच्या आजच्या अधिकृतरित्या खुलाशाकडे एक मोठा बदल म्हणून पाहीले जाणार आहे.

सार्वजनिक व्यासपीठावरुन कबुली

आपल्या भाषणात जनरल मुनीर यांनी पाकिस्तान आणि भारताशी झालेल्या संघर्षांचा उल्लेख करीत म्हटेल की ‘1948, 1965, 1971 हा भारत आणि पाकिस्तानी दरम्यानचे कारगिल युद्ध वा सियाचिन, यात अनेक लोकांनी आपले बलिदान दिले आहे. ही कबुली कारगिल संघर्षाच्या 25 वर्षांनंतर लष्कराची प्रमुखाकडून सार्वजनिक व्यासपीठावरुन आली आहे.

आंतरराष्ट्रीय समुदाची पाकवर टिका

कारगिल युद्धाची सुरुवात पाकिस्तानी सैनिक आणि अतिरेक्यांद्वारा भारतीय क्षेत्रातील घुसखोरीने झाली होती. याचा उद्देश्य कारगिल जिल्ह्यातील रणनीतीसाठी महत्वाच्या असलेल्या जागांवर कब्जा मिळविणे हा होता. संघर्षाचा शेवट भारताचा निर्णायक विजय आणि या क्षेत्रातून पाकिस्तानी सैन्याच्या माघारीने झाला. त्यावेळी अमेरिका आणि अन्य प्रमुख देशांसहीत आंतरराष्ट्रीय समुदायाने या संघर्षात पाकिस्तानच्या भूमिकेवर जोरदार टिका केली आहे.

हा मुशर्रश यांचा मुर्खपणा

कारगिल दु:साहसाने पाकिस्तानला मदत झाली नाही हे जगजाहीर आहे. हा मुशर्रश यांचा मुर्खपणा होता. ज्याला त्यांनी आणि चार जनरल यांच्या गटाने पुढाकार घेतला होता. नवाझ शरीफ यांनी यावर खुलेपणाने टिका केली होती असे पाकिस्तानातील भारताचे माजी उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी WION शी बोलताना सांगितले. मात्र, पाकिस्तानी लष्कराने आपल्या सहभागाची जाहीरपणे पुष्टी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. काही माजी अधिकाऱ्यांनी यापूर्वी कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याची भूमिका मान्य केली होती.

निवृत्तीनंतर यांनी दिली होती कबूली

उल्लेखनीय म्हणजे, पाकचे लेफ्टनंट जनरल ( निवृत्त ) शाहिद अझीझ यांनी निवृत्तीनंतर कारगिल संघर्षात पाकिस्तानी सैन्याचा सहभाग होता असे म्हटले होते. अझीझ यांच्या म्हणण्यानूसार, जनरल परवेझ मुशर्रफ, चीफ ऑफ जनरल स्टाफ लेफ्टनंट जनरल मोहम्मद अझीझ, एफसीएनए ( फोर्स कमांड नॉर्दर्न एरिया ) कमांडर लेफ्टनंट जनरल जावेद हसन आणि 10-कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल महमूद अहमद यांनी देखील कारगिल संघर्षात पाकचा हात असल्याचे म्हटले होते.

गुंतागुंत आणखीन वाढली

जनरल मुनीर यांनी कारगिर संघर्षाबाबत दिलेल्या कबूलीने पाकिस्तानात सुरु राजकारणाकडे लक्ष वेधले आहे. कारगिल संघर्षात पंतप्रधान असलेल्या नवाझ शरीफ यांनी पद सोडल्यानंतर देशाच्या भूमिकेचा स्वीकार केला आहे. शरीफ यांनी पाकिस्तानने 1999 च्या लाहोर कराराचा भंग केल्याचे म्हटले आहे. ज्यावर त्यांनी तत्कालिन भारतीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सोबत  त्यांनी सह्या केल्या होत्या. पाकिस्तानी सैन्य प्रमुखाची ही कबूली कारगिल संघर्षाच्या वारशाला आणखी जटिल बनविते आणि या समस्येभोवती असलेली अंतर्गत राजकीय आणि लष्करी गुंतागुंत आणखीन वाढवत आहे.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.