पाकिस्तानमध्ये पोलिसांकडून टिकटॉक स्टार आणि व्लॉगर्सनाही अटक; कारण काय?

पाकिस्तानमध्ये सध्या टिकटॉक स्टार आणि व्लॉगर्स पोलिसांच्या टार्गेटवर आहेत. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आणि स्थानिक पोलिसांनी आतापर्यंत 16 लोकांना अटक केली आहे, ज्यात बहुतांश व्लॉगर्स आणि टिकटॉक स्टारचा समावेश आहे.

पाकिस्तानमध्ये पोलिसांकडून टिकटॉक स्टार आणि व्लॉगर्सनाही अटक; कारण काय?
Follow us
| Updated on: Oct 27, 2024 | 12:21 AM

पाकिस्तानात सध्या टिकटॉक स्टार आणि व्लॉगर्सची पोलिसांकडून धरपकड सुरु आहे. पंजाब प्रांतातील एका विद्यार्थिनीवरील कथित बलात्काराच्या अफवा पसरवल्याबद्दल डझनहून अधिक व्लॉगर्स आणि टिकटॉक स्टार्सना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अफवेमुळे गेल्या आठवड्यात हिंसक निदर्शने झाली होती. पोलीस अधिकारी यांनी सांगितले की, पोलिसांनी हिंसा आणि तोडफोड करणाऱ्या ४० विद्यार्थ्यांचीही ओळख पटवली आहे.

फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एफआयए) आणि स्थानिक पोलिसांनी आतापर्यंत 16 लोकांना अटक केलीये, ज्यात बहुतांश व्लॉगर्स आणि टिकटॉक स्टार आहेत. या लोकांवर बलात्काराच्या कथित घटनेबाबत अफवा पसरवल्याचा आरोप आहे. तोडफोड आणि हिंसाचारात सहभागी असलेल्या इतर लोकांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे ते म्हणाले. या घटनेबाबत खोट्या बातम्या पसरवणारी १३८ सोशल मीडिया खातीही ब्लॉक करण्यात आली आहेत.

FIA च्या माहितीनुसार सायबर क्राईम विंगच्या तांत्रिक अहवालात 38 वरिष्ठ पत्रकार, वकील, व्लॉगर्स आणि टिकटॉक स्टार्सनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन कथित खोटा प्रचार शेअर करून लोकांना सरकारी आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत.

लाहोरमधील एका महाविद्यालयात सुरक्षा रक्षकाने विद्यार्थिनीवर केलेल्या कथित बलात्काराच्या बातम्यांवरून पंजाबच्या विविध शहरांमध्ये गेल्या आठवड्यात व्यापक निदर्शने झाली, ५० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आणि सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. यावेळी पोलिसांनी 600 हून अधिक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलंय.

पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी स्थापन केलेल्या तपास समितीने महाविद्यालयात बलात्कार झाल्याची पुष्टी केली नाही आणि प्रत्यक्षदर्शीही सापडला नाही. समितीने सुमारे 28 विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली, ज्यांनी सांगितले की त्यांनी या घटनेबद्दल इतर लोकांकडून ऐकले आहे. सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून हे प्रकरण खळबळ माजवल्याचे अहवालात म्हटले आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफने तुरुंगात टाकून सोशल मीडियावर या प्रकरणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मरियम नवाज यांनी केला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.