वर्षभरात पाकिस्तानात कांद्याचे दर ५०० टक्के वाढले, डॉलरच्या तुलनेत रुपया २२५ वर

पाकिस्तानचा महागाई दर आता २५ टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे. जानेवारी २०२२ मध्ये हा दर १३ टक्के होता. म्हणजेच वर्षभरात महागाई दर दुप्पट झाला आहे. जानेवारी २०२२ मध्ये पाकिस्तानात कांदा ३६ रुपये किलो होता. त्यात ५०० टक्के वाढ झाली आहे.

वर्षभरात पाकिस्तानात कांद्याचे दर ५०० टक्के वाढले, डॉलरच्या तुलनेत रुपया २२५ वर
Shehbaz SharifImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 3:52 PM

लाहोर :pakistan :पाकिस्तान (pakistan)प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. पाकिस्तानातील महागाई प्रचंड वाढलीय. पाकिस्तानात (pakistan) वर्षभरात कांद्याचे दर ५०० टक्के वाढले आहे. पाकिस्तानच्या परदेशी चलनाचा साठा फक्त तीन आठवड्यांचा राहिला आहे. पाकिस्तानात सर्वच जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे.

आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या पाकिस्तानने दिवाळखोरी टाळण्यासाठी सौदी अरेबियाकडे मोर्चा वळवला आहे. सौदी अरेबियाकडून पाकिस्तानला ३ अब्ज डॉलरचे कर्ज हवे आहे. एका वर्षात पाकिस्तान सौदी अरेबियाकडून कर्ज घेण्याची ही दुसरी वेळ आहे. परंतु राजे मोहम्मद बिन सलमान यांनी अद्याप या कर्जाला अंतिम मंजुरी दिली नाही. पाकिस्तानला सौदी अरेबियाकडून मदत मिळाली तरी त्यानंतरही त्यांचे आर्थिक संकट पूर्णपणे संपणार नाही.

हे सुद्धा वाचा

पाकिस्तानचा महागाई दर आता २५ टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे. जानेवारी २०२२ मध्ये हा दर १३ टक्के होता. म्हणजेच वर्षभरात महागाई दर दुप्पट झाला आहे. जानेवारी २०२२ मध्ये पाकिस्तानात कांदा ३६ रुपये किलो होता. त्यात ५०० टक्के वाढ झाली आहे. आता पाकिस्तानात कांद्याचे दर २२० रुपयांवर आहे. आटा १६०, साखर १०० रुपये किलो मिळत आहे. बासमती तांदूळ ३६ रुपयांवर २२० रुपयांवर जाऊन पोहचला आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खराब झाल्यामुळे पाकिस्तानी रुपयांत प्रचंड घसरण झाली आहे. पाकिस्तान रुपया २०२० मध्ये १ डॉलरच्या तुलनेत १६० रुपये होता. आता तो दर २२५ रुपयांवर गेला आहे. जागतिक बाजारपेठेत साखरेच्या किंमती वाढल्या आहेत. यामुळे पाकिस्तानला साखरेच्या आयातीवर जास्त खर्च करावा लागत आहे. लोकांना साखर आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांचा तुटवडा जाणवत आहे. पाकिस्तानमध्ये एक किलो साखर सुमारे 100 रुपयांना मिळते.

का निर्माण झाली अशी परिस्थिती :  जर पाकिस्तानने भारताशी व्यापारी संबंध तोडले नसते किंवा काही काळानंतर त्यात सुधारणा केली असती तर पाकिस्तानची परिस्थिती वेगळी असती. भारतातून साखर आयात केल्यानंतर त्यांना आयात खर्च खूपच कमी झाला असता.कारण दोन्ही देशातून रस्तेमार्गाने साखरेची वाहतूक कमी खर्चात झाली असती. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानच्या साखर उत्पादन क्षमतेत मोठी घट झाली आहे. साखरेसाठी ते आयातीवर अवलंबून झाले आहे, मात्र पाकिस्तानी रुपयाच्या कमजोरीमुळे साखरेची पुरेशा प्रमाणात आयात होत नाही.पाकिस्तान सध्या साखर पुरवठ्यासाठी UAE, ब्राझील, इजिप्त आणि अल्जेरिया या देशांवर अवलंबून आहे. पाकिस्तान-भारत संबंध चांगले असते तर साखर खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागले नसते. कारण भारत सवलतीच्या दराने साखर आयात करत आहे.

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...