नकोच हा देश… अर्ध्याहून अधिक पाकिस्तानी तरुणांना देश सोडून जायचंय; अहवालातील धक्कादायक माहिती

पाकिस्तानातील पीआयडीई या संस्थेने एक धक्कादायक माहिती दिली आहे. या संस्थेच्या सर्व्हेनुसार पाकिस्तानातील अर्ध्याहून अधिक तरुणांना देश सोडून जायचं आहे. पुरेशा संधी नाहीत आणि महागाईचा आगडोंब यामुळे या तरुणांना देश सोडून जायचं आहे.

नकोच हा देश... अर्ध्याहून अधिक पाकिस्तानी तरुणांना देश सोडून जायचंय; अहवालातील धक्कादायक माहिती
pakistani youthImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 2:09 PM

कराची : आर्थिक संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं आहे. पाकिस्तानमध्ये आर्थिक चणचण निर्माण झाल्याने महागाई प्रचंड वाढली आहे. बेरोजगारी वाढली आहे. हाताला काम नाही. त्यातच धार्मिक तंटे बखेडे सुरूच आहे. हे कमी काय, येथील सरकार ही अस्थिर आहे. त्यामुळे पाकिस्तानी तरुण हवालदिल झाले आहेत. या तरुणांना आता आपल्याच देशाचा तिटकारा आला आहे. पाकिस्तानमध्ये राहणं नकोच असं हे तरुण म्हणत आहेत. एका सर्व्हेतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व्हेनुसार 67 टक्के तरुणांना हा देश सोडून जायचा आहे. मागच्या सर्व्हेत हा आकडा 62 टक्के इतका होता.

पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हल्पमेंट इकॉनॉमिक्स ( पीआयडीई)ने हा सर्व्हे केला आहे. या संस्थेचे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. फहीम जहांगीर खान यांनी या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चांगल्या संधीसाठी देशातील 67 टक्के तरुणांना देश सोडून जावसं वाटतंय. पाकिस्तानमध्ये 31 टक्के शिकलेले तरुण बेरोजगार आहेत, असं खान यांनी सांगितलं. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर इकोनफेस्ट या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या दोन दिवसीय चर्चासत्रात फहीम खान यांनी हे मत मांडलं.

हे सुद्धा वाचा

विद्यापीठातून फक्त डिग्र्या मिळतात

सरकारने समस्येतून मार्ग काढण्यासाठी तरुणांच्या मुद्द्यांवर लक्ष दिलं पाहिजे. पाकिस्तानात 200 हून अधिक विद्यापीठे आहेत. या विद्यापीठातून दरवर्षी हजारो विद्यार्थी पदव्या घेऊन बाहेर पडत आहेत. पण त्यांना नोकऱ्या मिळत नाहीये. कारण डिग्री म्हणजे रोजगाराची हमी नाही. कारण या तरुणांकडे स्किल्स नाहीये. कंपन्या मात्र स्किल्सबाबत विचारणा करत आहे. त्यामुळे शिक्षकांसह सरकारनेही या समस्यांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, असं खान यांनी सांगितलं.

या तरुणांना देश सोडायचाय

15 ते 24 वर्ष वयाच्या तरुणांमध्ये पाकिस्तान सोडून जाण्याची तीव्र इच्छा आहे. देशाची आर्थिक स्थिती चांगली नाही. तसेच देशात संधी नाहीये. त्यामुळे या तरुणांना देश सोडून जायचा आहे, असं सर्व्हेत नमूद करण्यात आलं आहे. पाकिस्तान सध्या एका विचित्र परिस्थितीत आहे. आम्ही नोकरीसाठी मुलाखती घेतो. पण योग्य उमेदवार मिळत नाही. दुसरीकडे योग्य उमेदवारांना रोजगार मिळत नाही, अशी दुहेरी विचित्र परिस्थिती आहे. शिक्षकांकडूनही विद्यार्थ्यांना आवश्यक ते शिक्षण दिलं जात नाही. प्रत्येक वर्षी त्याच त्याच जुन्या नोट्स देऊन काम भागवलं जात आहे, असं ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. दुर्रे नायब यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.