पाकिस्तानकडून ‘पीओके’ जाणार ? हिंसक आंदोलनानंतर घाबरलेले पंतप्रधान शहबाज यांचे वक्तव्य
pakistan clashes: पीओकेमध्ये वाढणारे कर आणि महागाईच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन रविवारपासून हिंसक झाले आहे. विरोध प्रदर्शन करणाऱ्या लोकांवर सुरक्षा दलाकडून बळाचा वापर केला गेला. यामुळे अनेक ठिकाणी सुरक्षा दल आणि प्रदर्शनकारी यांच्यात चकमक उडाली.
पाकिस्तान भारतातील काश्मीरमध्ये नेहमी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो. परंतु आता पाकिस्तान व्याप्त काश्मीरच (पीओके) त्यांना सांभाळता येत नाही. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खालवलेली असताना आता पीओकेचा प्रश्न त्यांच्यासाठी संकट झाले आहे. पीओकेमध्ये सुरु असलेले तीव्र आंदोलन लष्करी बळावर दाबण्याचा प्रयत्न पाकिस्तान सरकार करत आहे. त्यातच या आंदोलनामुळे घाबरलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे वक्तव्य समोर आले आहे. अनेक दिवसांपासून काश्मिरी आणि पोलिसांमध्ये सुरु असलेल्या चकमकीवर त्यांनी भाष्य केले आहे.
काय म्हणाले शहबाज शरीफ
पीओकेमधील नागरिकांचा आवाज दाबण्यासाठी पाकिस्तान सरकारने प्रत्येक चौकात पोलिसांना उभे केले आहे. आता या प्रकरणात पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मौन सोडले आहे. त्यांनी पीओकेमधील परिस्थितीवर चिंता व्यक्त करत सर्व पक्षांना शांतामय मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे. अराजकतेच्या या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न काही लोक करणार आहे. काही जण राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करतील. परंतु चर्चा आणि शांतता हा लोकशाहीचा सर्वात सुंदर मार्ग आहे. जनतेने कायदा हातात घेऊ नये. सरकारी संपत्तीला नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही.
Deeply concerned about the situation in AJK.
Unfortunately in situations of chaos and dissent there are always some who rush in to score political points. While debate, discussion and peaceful protests are the beauties of democracy , there should be absolutely no tolerance for…
— Shehbaz Sharif (@CMShehbaz) May 12, 2024
पोलिसांकडून हवेत गोळीबार
पोलिसांनी पीओकेमधील आंदोलन दडपण्यासाठी बळाचा वापर सुरु केला आहे. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि हवेत गोळाबार केला आहे. आता पोलिसांकडून परिस्थिती अटोक्यात आणली जात नसल्यामुळे रेंजर्स आणि फ्रंटियर कोर तैनात केले आहे. रेंजर्सकडून एक 47 फायरिंग केल्याचे व्हिडिओ समोर आला आहे. तसेच विरोध प्रदर्शन करणाऱ्या लोकांना नदीत फेकले जात असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
Dear International Media,
What is stopping you from reporting about the oppression of Kashmiris in Pakistan Occupied Kashmir (PoK) by Pakistan & its forces?
Even when a terrorist is eliminated in India, you all target Indian forces & accuse India of oppressing Kashmiris. pic.twitter.com/6QLixLqGs9
— Anshul Saxena (@AskAnshul) May 12, 2024
विरोध प्रदर्शन संयुक्त अवामी एक्शन कमेटीच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. सध्या मुझफ्फरबादमध्ये बंद पुकारण्यात आला असून ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले जात आहे. सुरक्षा दलाने कमिटीच्या अनेक लोकांना अटक केली आहे.
कृपया अधिक से अधिक शेयर करें ..
पाकिस्तान कब्जे वाले कश्मीर में पाकिस्तानी सुरक्षा बल कश्मीरी प्रदर्शनकारियों को पाकिस्तान अधिकृत कश्मीर में पहाड़ियों से नदी में फेंक रहे हैं। यह पूरी तरह से मानवाधिकार का उल्लंघन है. उम्मीद है @UNHumanRights PoK के हालात पर नजर रख रही होगी. pic.twitter.com/7ZA4uqkXID
— हम लोग We The People 🇮🇳 (@ajaychauhan41) May 11, 2024
का सुरु झाला हिंसाचार
पीओकेमध्ये वाढणारे कर आणि महागाईच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन रविवारपासून हिंसक झाले आहे. विरोध प्रदर्शन करणाऱ्या लोकांवर सुरक्षा दलाकडून बळाचा वापर केला गेला. यामुळे अनेक ठिकाणी सुरक्षा दल आणि प्रदर्शनकारी यांच्यात चकमक उडाली. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.