Pakistan Election: पाकिस्तानात मतमोजणी सुरु, पाहा आतापर्यंत कोणत्या पक्षाने घेतली आघाडी

Pakistan election Result : पाकिस्तानात काल मतदान पार पडल्यानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात झाली. पण दुसऱ्या दिवशीही मतमोजणी सुरुच आहे. आतापर्यंत फक्त ८ निकाल निवडणूक आयोगाने जाहीर केले आहेत. इम्रान खान तुरुंगात असल्याने निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Pakistan Election: पाकिस्तानात मतमोजणी सुरु, पाहा आतापर्यंत कोणत्या पक्षाने घेतली आघाडी
Follow us
| Updated on: Feb 09, 2024 | 6:45 PM

Pakistan election result : पाकिस्तानमध्ये गुरुवारी मतदान झाले असून मतमोजणी अजूनही सुरूच आहे. निवडणूक निकालांना उशीर झाल्यामुळे पाकिस्तानातील लोकं नाराजी व्यक्त करत आहेत. इम्रान खान यांना पाठिंबा देणारे अपक्ष उमेदवार पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी विजयी झालेत. इम्रान खान यांच्या पक्षाचे ४९ अपक्ष उमेदवार विजयी झालेत. रॉयटर्सच्या बातमीनुसार, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पाठिंबा असलेले 49 उमेदवार विजयी झाले आहेत. आतापर्यत १३६ जागांचा निकाल जाहीर झाला आहे. नवाझ शरीफ, शाहबाज शरीफ, बिलावल भुट्टो, मरियम नवाज यांचा देखील विजय झाला आहे. मात्र, नवाझ शरीफ यांचा मानसेरा मतदारसंघातून पराभव झालाय.

नवाज शरीफ एका जागेवर पराभूत

नवाझ शरीफ यांचा अपक्ष उमेदवार शहजादा गस्तसाप यांनी पराभव केला आहे. शहजादा गस्तसाप यांना ७४,७१३ मते मिळाली, तर नवाज शरीफ यांना ६३,०५४ मतांवर समाधान मानावे लागले. पाकिस्तानमध्ये नॅशनल असेंब्ली आणि प्रांतीय निवडणुकांसाठी मतदान संपल्यानंतर मतमोजणी आजही सुरूच आहे. अधिकृत निकाल अजून पुढे आलेला नाही. मानसेरा हा पाकिस्तान मुस्लीम लीगचा बालेकिल्ला मानला जातो. असे असतानाही नवाज शरीफ यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण त्यांनी लाहोर NA130 या दुसऱ्या जागेवरून विजय मिळवला आहे.

सरकार स्थापनेचा दावा कोण करणार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इम्रान खान यांच्या पक्षाचे उमेदवार 154  उमेदवार हे आघाडीवर आहेत, तर नवाझ शरीफ यांचा पक्ष पीएमएल (एन) आणि बिलावल भुट्टो यांचा पक्ष पीपीपी प्रत्येकी 47 जागांवर आघाडीवर आहे. इम्रान खान यांच्या पक्षाचे अध्यक्ष बॅरिस्टर गौहर अली खान यांनी दावा केला आहे की त्यांचा पक्ष सरकार स्थापनेचा दावा करणार आहे.

नवाज शरीफ यांचा भाऊ शाहबाज शरीफ आणि मरियम यांनी देखील विजय मिळवला आहे. लाहोरच्या पीपी-१५८ जागेवरून शहबाज शरीफ तर लाहोरच्या पीपी-१५९ जागेवरून मरियम नवाज विजयी झाले आहेत.

इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद

नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम औरंगजेब यांनी पंजाब प्रांतासह केंद्रात आमचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा केलाय. मोबाईल सेवा आणि इंटरनेट सेवा बंद असल्याने निकाल येण्यास विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले.

इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी दावा केला आहे की त्यांच्या पक्षाचे उमेदवार विजयी होत असल्याने निकालाला उशीर केला जात आहे. पीटीआयचे ओमारी अयुब यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक रिटर्निंग अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील स्क्रीन बंद करण्यात आल्या आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.