Pakistan election : पाकिस्तानात कोणाचं सरकार येणार? पाहा कोणी जिंकल्या सर्वाधिक जागा

Pakistan Election 2024 : पाकिस्तानात गुरुवारी सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर आता शुक्रवारी जवळपास २५० हून अधिक जागांचे निकाल जाहीर झाले असून काही जागांचे निकाल येणं बाकी आहे. आतापर्यंत अपक्ष आमदारांनी सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. माजी आमदार इम्रान खान आणि नवाझ शरीफ यांच्यात सरळ टक्कर आहे.

Pakistan election : पाकिस्तानात कोणाचं सरकार येणार? पाहा कोणी जिंकल्या सर्वाधिक जागा
Follow us
| Updated on: Feb 10, 2024 | 5:40 PM

Pakistan election result : पाकिस्तानात गुरुवारी मतदान झाल्यानंतर शुक्रवारी मतमोजणी पार पडली. ज्यामध्ये कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळताना दिसत नाहीये. त्यातच आता माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते गौहर अली खान यांनी त्यांचा पक्ष सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. कारण सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्याकडे सर्वाधिक जागा असल्याचं समोर आलं आहे. इम्रान खान सध्या तुरुंगात आहेत. इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ल्यांशी संबंधित 12 प्रकरणांमध्ये जामीन मिळाला आहे.

२५० जागांचे निकाल जाहीर

पाकिस्तानमध्ये गुरुवारी एकूण 265 जागांसाठी निवडणूक झाली. अहवालानुसार, आतापर्यंत 250 हून अधिक जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. जाहीर झालेल्या निकालामध्ये अपक्ष उमेदवारांनी सर्वाधिक ९९ जागा जिंकल्या आहेत. त्यापैकी 91 उमेदवार इम्रान यांना पाठिंबा देणारे मानले जात आहेत. त्याचवेळी नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एनने 69 जागा जिंकल्या आहेत आणि पीपीपीने 52 जागा जिंकल्या आहेत.

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या मते, इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते गौहर अली खान यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी या जनादेशाचा आदर करण्याचे आवाहन केले. उर्वरित जागांचे निकाल शनिवारी रात्रीपर्यंत जाहीर न झाल्यास त्यांचा पक्ष रविवारी शांततेत आंदोलन करणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे.

बहुमताचे गणित काय?

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या 336 जागा आहेत, त्यापैकी 266 जागांवर निवडणूक होते. उर्वरित 70 जागा राखीव आहेत. त्यापैकी 60 जागा महिलांसाठी आणि 10 जागा मुस्लिमेतर उमेदवारांसाठी आहेत. राष्ट्रीय विधानसभेत बहुमतासाठी 133 जागांची आवश्यकता आहे.

इम्रान खान आणि नवाझ शरीफ या दोघांकडून विजयाचा दावा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि इम्रान खान या दोघांनीही विजयाचा दावा केला आहे. नवाझ शरीफ यांच्या पक्षाने निवडणुकीत इतर कोणत्याही पक्षाच्या तुलनेत सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. परंतु इम्रान खान यांना तुरुंगात टाकल्यानंतर त्यांच्या पक्षावर देखील बंदी घालण्यात आली होती. पण त्यांच्या समर्थक उमेदवारांनी अपक्ष निवडणूक लढवली. ज्यापैकी ९२ उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे पाकिस्तानाता सस्पेंस कायम आहे की आता कोणाचे सरकार स्थापन होऊ शकते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.