जंग करनी हो तो 9 बजे से पहले करले ना, सव्वा नौ बजे गॅस चली जाती है हमारी; पाकिस्तानी नागरिकांनी उडवली आपल्याच सरकारची खिल्ली
भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचं वातावरण असताना सध्या लोक सोशल मीडियावरही संताप व्यक्त करत आहेत.

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे भारतातून संताप व्यक्त केला जातोय. या हल्ल्याच्या अनेक करुणकहाण्या समोर येत आहेत. दहशतवाद्यांनी लोकांना त्यांची नावं आणि धर्म विचारून गोळ्या घातल्याचं प्रत्यक्षदर्शींनी तसेच मृतांच्या नातेवाईकांनी सांगितलंय. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचं वातावरण असताना सध्या लोक सोशल मीडियावरही संताप व्यक्त करत आहेत.
पाकिस्तानची लाज त्यांच्याच लोकांनी काढली
भारत देशातील सोशल मीडियाव युजर तर पाकिस्तानला जशास तसा धडा शिकवा अशी मागणी करत आहेत. पाकिस्तानमध्ये मात्र नेटकरी त्यांच्याच देशाची लक्तरं वेशीला टांगत आहेत. काही पाकिस्तानी नेटकऱ्यांनी त्यांच्याच देशाची लाज काढली आहे. काही सोशल मीडिया युजर्सने तर भारत आता आपल्यावर बॉम्ब टाकणार अशी भीती व्यक्त केली आहे. काश्मीरमध्ये हल्ला केल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांची आता झोप उडाली आहे.
एक जण म्हणते आमच्या घरातला गॅस संपतो
एका नेटकऱ्याने या हल्ल्यानंतर पाकिस्तानात किती बिकट परस्थिती आहे, हे सांगितलं आहे. तुम्हाला युद्ध करायचं असेल तर 9.15 वाजता करा. कारण त्यानंतर आमच्याकडचा गॅस संपून जातो, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय. याच ट्विटला अक्रम नावाच्या युजरने पाकिस्तान किती गरीब आहे, तुम्ही किती गरीब देशाशी लढत आहात, हे समजलं पाहिजे, असं म्हटलंय.
लाहोर शहराचे काढले वाभाडे
नमलुमा फराद नवाच्या एका इंटरनेट युजरने तर भारत पाणी रोकण्याचा विचार करत आहे. आमच्याडे अगोदरच पाणी येत नाही. दुसरीकडे आमचे सरकार मरसणासन्न आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही लाहोर शगरावर कब्जा करण्याचा विचार करत असाल तर ते शहर घेऊन टाका. त्या शहराची फारच वाईट परिस्थिती आहे. तुम्ही ते अर्ध्या तासात आम्हाला परत कराल, अशी आपल्याच देशाची निर्भर्त्सना या युजरने केली आहे.
These Pak people are roasting themselves on a different level 😭 pic.twitter.com/ckAA4F2So1
— Phunsuk Wangdu (@Phunsukwangduji) April 25, 2025
सेना हायअलर्टवर, दिल्लीत बैठकांचे सत्र
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्ताविषयी चांगलीच कठोर भूमिका घेतली आहे. दिल्लीमध्ये आज (25 एप्रिल) अनेक महत्त्वाच्या बैठका पार पडल्या. दुसरीकडे भारतीय सैन्यदलही सज्ज झाले आहे. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी युद्धाभ्यास चालू झाला आहे. भारताची वायूसेना, नौदल आणि भूदल हे तिन्ही विभाग हायअलर्टवर आहेत. त्यामुळे आगामी काही दिवसांत नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.