अफगाणिस्तानवर पाकिस्तानचे हल्ले, मशिदीवर डागले रॅकेट…तालिबानकडून जोरदार प्रत्युत्तर

तालिबानीकडून गोजगढी, माटा सांगर, कोट राघा आणि मेंगल भागात जोरदार हल्ले केले जात आहे. दुसरीकडे पाकिस्ताने म्हटले आहे की, पाकिस्तान लष्कराने खुर्रम आणि उत्तरी वजीरिस्तान भागात तालिबानकडून होणारी घुसखोरी रोखली आहे.

अफगाणिस्तानवर पाकिस्तानचे हल्ले, मशिदीवर डागले रॅकेट...तालिबानकडून जोरदार प्रत्युत्तर
फाईल फोटो
Follow us
| Updated on: Dec 30, 2024 | 4:03 PM

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष अधिकच चिघळत आहे. पाकिस्तानने नुकतीच अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक केली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये हल्ले वाढले आहे. दोन्ही देशांचे लष्कर एकमेकांच्या सीमा रेषेत घुसून कारवाई करत आहे. सोमवारी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या आठ नागरिकांची हत्या केली. तसेच १३ जण गंभीर जखमी झाले.

पाकिस्तानने पक्तिया येथील एका मशिदीवर रॅकेट हल्ला केला. त्यात तीन जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर अफगाणिस्तानने या प्रकरणात आंतरराष्ट्रीय दखल देण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानकडून अफगाणिस्तानमधील नागरिकांना लक्ष केले जात असल्याचा दावा अफगाणिस्तानने केला आहे.

हे सुद्धा वाचा

पाकिस्तानचे १९ सैनिक ठार

टोलो न्यूजमधील रिपोर्टनुसार, तालिबान संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार, डूरंड लाइनवर दोन्ही बाजूंनी हिंसक चकमक होत आहे. तालिबानने पाकिस्तानी लष्कराच्या दोन चौक्यांवर कब्जा केला आहे. तालिबानी सैनिकांनी ड्युरंड रेषेवर असलेल्या पाकिस्तानी लष्कराच्या अनेक चौक्या जाळल्या आहेत. या हल्ल्यात पाकिस्तान लष्कराचे १९ सैनिक ठार झाले आहेत. त्यानंतर अनेक सैनिक चौक्या सोडून पळून गेले आहे. त्याचे व्हिडिओ अफगाणिस्ताने सोशल मीडियावर शेअर केले आहे. तालिबाने पाकिस्तानचा ध्वज काढून आपला ध्वज लावला आहे.

तालिबानीकडून गोजगढी, माटा सांगर, कोट राघा आणि मेंगल भागात जोरदार हल्ले केले जात आहे. दुसरीकडे पाकिस्ताने म्हटले आहे की, पाकिस्तान लष्कराने खुर्रम आणि उत्तरी वजीरिस्तान भागात तालिबानकडून होणारी घुसखोरी रोखली आहे. दरम्यान, तालिबानने म्हटले आहे की, पाकिस्तानच्या हल्ल्यात ५० नागरिकांचा मृत्यू झाली आहे. त्यात अनेक महिला आणि मुले आहेत. यामुळे या प्रकरणात आंतरराष्ट्रीय पातळीवरुन दखल घेतली गेली पाहिजे.

काय आहे वाद

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील २६४० किमी लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेचे नाव ड्युरंड लाइन आहे. ही रेषा पश्तून आदिवासी भागातून आणि दक्षिणेकडील बलुचिस्तानमधून जाते. ही रेषा पश्तून आणि बलुच या दोन भागांत विभागली आहे. ती जगातील सर्वात धोकादायक सीमा देखील मानली जाते. या सीमेवरुन दोन्ही देशांत वाद आहे.

ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....
शिवाजीपार्कातील शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला भगदाड
शिवाजीपार्कातील शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला भगदाड.
गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या कारचा कट अन् पाळदी गावात 2 गटात राडा
गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या कारचा कट अन् पाळदी गावात 2 गटात राडा.
लुप्त 'सरस्वती' पुन्हा पृथ्वीवर अवतरली? जैसलमेरमध्ये नेमकं काय घडलं?
लुप्त 'सरस्वती' पुन्हा पृथ्वीवर अवतरली? जैसलमेरमध्ये नेमकं काय घडलं?.
फाडूनिया छाती 'पुन्हा' दाविले पवार, नरहरी झिरवाळ नेमकं काय म्हणाले?
फाडूनिया छाती 'पुन्हा' दाविले पवार, नरहरी झिरवाळ नेमकं काय म्हणाले?.
बीड सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाती, सुदर्शन घुले कुठं लपला?
बीड सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाती, सुदर्शन घुले कुठं लपला?.
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....