Pakistan आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावर, पेट्रोल-डिझेल आणि LPG दर पाहून धक्काच बसेल

Pakistan Petrol Diesel Price : आर्थिक संकटाशी सामना करत असलेल्या पाकिस्तानात सध्या परिस्थिती बिकट झाली आहे. सर्वसामान्यांना महागाईच्या झळा बसत आहे. सर्वच गोष्टींच्या किंमती वाढल्या आहेत. पाकिस्तानमध्ये पेट्रोल, डिझेल आणि सिलेंडरच्या किंमतीने रेकॉर्डब्रेक पातळी गाठली आहे.

Pakistan आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावर, पेट्रोल-डिझेल आणि LPG दर पाहून धक्काच बसेल
Follow us
| Updated on: Oct 04, 2023 | 3:17 PM

Pakistan economic crisis : पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. पाकिस्तानची परिस्थिती बिकट होत आहे. महागाईने रेकॉर्डब्रेक केले आहे. सप्टेंबर 2023 मध्ये महागाईचा दर 30 टक्क्यांच्या वर गेलाय. सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर शहरी भागात 29.7 टक्के आणि ग्रामीण भागात 33.9 टक्के झाला आहे. पाकिस्तानात सर्वसामान्यांना जगणं कठीण बनले आहे. पाकिस्तानाला आयएमएफकडून पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

पाकिस्तानात महागाई का वाढत आहे?

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींसोबतच विजेच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे पाकिस्तानमध्ये महागाई वाढली आहे. देशातील खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर वर्षभरात 33.1 टक्क्यांवर पोहोचला आहे. मे 2023 मध्ये पाकिस्तानमधील महागाईचा दर 38 टक्क्यांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता.

पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर किती

पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर 331.38 रुपये आहे. डिझेलचा दरही 329.18 रुपये प्रतिलिटर झाला आहे. याशिवाय एलपीजी सिलिंडरची किंमत 3079.64 रुपये आहे. यावरुन महागाईची कल्पना येऊ शकते.

IMF ने पाकिस्तानला दिवाळखोरीतून वाचवले

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) 3 अब्ज डॉलरच्या बेलआउट पॅकेजला मंजुरी दिल्यानंतरही पाकिस्तान सरकार महागाई नियंत्रणात अपयशी ठरले आहे. आयएमएफने पाकिस्तानला बेलआउट पॅकेज देऊन दिवाळखोरीपासून वाचवले, पण तेथील सरकार महागाईवर नियंत्रण ठेवू शकलेले नाही.

पाकिस्तानमधील महागाई दर भारताच्या तुलनेत 5 पटीने जास्त

भारताच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये महागाईचा दर पाचपट जास्त आहे. ऑगस्ट महिन्यात भारतातील किरकोळ चलनवाढीचा दर (CPI) जुलैमधील 7.44 टक्क्यांच्या तुलनेत घसरून 6.83 टक्क्यांवर आला आहे. तर पाकिस्तानमध्ये चलनवाढीचा दर 30 टक्क्यांहून अधिक आहे.

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.