Pakistan economic crisis : पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. पाकिस्तानची परिस्थिती बिकट होत आहे. महागाईने रेकॉर्डब्रेक केले आहे. सप्टेंबर 2023 मध्ये महागाईचा दर 30 टक्क्यांच्या वर गेलाय. सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर शहरी भागात 29.7 टक्के आणि ग्रामीण भागात 33.9 टक्के झाला आहे. पाकिस्तानात सर्वसामान्यांना जगणं कठीण बनले आहे. पाकिस्तानाला आयएमएफकडून पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.
पाकिस्तानात महागाई का वाढत आहे?
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींसोबतच विजेच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे पाकिस्तानमध्ये महागाई वाढली आहे. देशातील खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर वर्षभरात 33.1 टक्क्यांवर पोहोचला आहे. मे 2023 मध्ये पाकिस्तानमधील महागाईचा दर 38 टक्क्यांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता.
पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर 331.38 रुपये आहे. डिझेलचा दरही 329.18 रुपये प्रतिलिटर झाला आहे. याशिवाय एलपीजी सिलिंडरची किंमत 3079.64 रुपये आहे. यावरुन महागाईची कल्पना येऊ शकते.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) 3 अब्ज डॉलरच्या बेलआउट पॅकेजला मंजुरी दिल्यानंतरही पाकिस्तान सरकार महागाई नियंत्रणात अपयशी ठरले आहे. आयएमएफने पाकिस्तानला बेलआउट पॅकेज देऊन दिवाळखोरीपासून वाचवले, पण तेथील सरकार महागाईवर नियंत्रण ठेवू शकलेले नाही.
भारताच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये महागाईचा दर पाचपट जास्त आहे. ऑगस्ट महिन्यात भारतातील किरकोळ चलनवाढीचा दर (CPI) जुलैमधील 7.44 टक्क्यांच्या तुलनेत घसरून 6.83 टक्क्यांवर आला आहे. तर पाकिस्तानमध्ये चलनवाढीचा दर 30 टक्क्यांहून अधिक आहे.