भाजप आणि आरएसएसची विचारसरणी भारतासाठीच धोकादायक, POK मधील निवडणूक सभेत इम्रान खान यांची टीका

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केलीय.

भाजप आणि आरएसएसची विचारसरणी भारतासाठीच धोकादायक, POK मधील निवडणूक सभेत इम्रान खान यांची टीका
Follow us
| Updated on: Jul 18, 2021 | 6:46 PM

Imran Khan Attacks PM Modi, RSS इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केलीय. “भाजप आणि आरएसएसची विचारसरणी भारतासाठीच धोकादायक आहे. ते केवळ मुस्लिमांनाच दुय्य्म नागरिक मानत नाहीत, तर शिख, ख्रिश्चन आणि अनुसुचित जातींनाही समान नागरिक मानत नाहीत,” असाही आरोप इम्रान कान यांनी केला. ते शनिवारी (17 जुलै) पाकव्याप्त काश्मीरमधील एका निवडणूक प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी स्वतःला आंतरराष्ट्रीय मंचावरील काश्मीरी लोकांचा (Imran Khan on Kashmiris) ‘ब्रँड अॅम्बेसिडर’ म्हटलं.

इम्रान खान पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेत म्हणाले, “भाजप आणि आरएसएसची विचारसरणी स्वतः भारतासाठी धोकादायक आहे. कारण ही विचारसरणी केवळ मुस्लीम नाही, तर शिख, ख्रिश्चन आणि अनुसुचित जातींना देखील लक्ष्य करते. ते त्यांनाही समान नागरिक मानत नाहीत.”

“कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये ‘अत्याचारात’ वाढ”

या सभेत इम्रान खान यांनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या भारताच्या निर्णयाचाही विरोध केला. “जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर 5 ऑगस्ट 2019 पासून काश्मीरमध्ये ‘अत्याचारात’ वाढ झालीय. या संघर्षात पाकिस्तान काश्मिरी लोकांच्या सोबत उभा आहे,” असंही इम्रान खान म्हणाले.

पीओकेत 25 जुलै रोजी निवडणूक

पाकव्याप्त काश्मीरमध्ये 25 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक दावे केले. पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडत असल्याची परिस्थिती असताना आणि कर्जाचा डोंगर तयार झालेला असतानाही त्यांनी पाकिस्तानमधील तहरीक-ए-इंसाफ पक्षाच्या आर्थिक धोरणांबद्दल स्वतःची पाठ थोपटवून घेतली. तसेच कुराणचा आधार घेत मी जगभरातील काश्मीरी लोकांचा मुद्दा मांडत राहिल असं सांगितलं. याआधी इम्रान खान यांनी अफगाणिस्तानमधील हिंसेत झालेली वाढ आणि पाकिस्तानकडून तालिबान्यांना होणाऱ्या मदतीच्या आरोपांचं खंडन केलं. तसेच यासाठी पाकिस्तानला दोष देणं योग्य नसल्याचं म्हटलं.

हेही वाचा :

पाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका

पाकिस्तान कर्जात नाकापर्यंत बुडालं, चीनच्या डावात अलगद फसलं!

‘बलात्कारासाठी भारतीय संस्कृती जबाबदार’, इम्रान खान बरळले, वक्तव्याविरोधात पाकिस्तानमध्येही तीव्र प्रतिक्रिया

व्हिडीओ पाहा :

Pakistan PM Imran Khan criticize BJP and RSS over discrimination with minorities

Non Stop LIVE Update
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.