आश्चार्य, पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले, आम्ही भारताशी तीन युद्ध लढलो, आम्हाला धडा मिळाला
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांना साक्षात्कार झाला आहे. आता प्रथमच पाकिस्तानी पंतप्रधानांनी जाहीर कबुली दिली आहे. आम्ही भारताशी तीन युद्ध लढलो आहे. आम्हाला धडा मिळाला आहे,
लाहोर : Pakistan PM Shehbaz Sharif: पाकिस्तान (pakistan)प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. आर्थिक संकटापाठोपाठ पाकिस्तानमधील परकीय चलनाचा साठा संपत आला. पाकिस्तानच्या परदेशी चलनाचा साठा गेल्या महिन्यात 294 मिलियन डॉलरने कमी होऊन 5.8 अब्ज डॉलरवर आला आहे. पाकिस्तानच्या या परिस्थितीनंतर पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif)यांना साक्षात्कार झाला आहे. आता प्रथमच पाकिस्तानी पंतप्रधानांनी जाहीर कबुली दिली आहे. आम्ही भारताशी तीन युद्ध लढलो आहे. आम्हाला धडा मिळाला आहे, असे एका मुलाखतीत शरीफ यांनी म्हटले. शहबाज यांनी अरबिया टीव्हीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी शांतीचा पाढा गायला. पाकिस्तानने शेजारी देशांशी मित्रात्वाने राहिले पाहिजे. एकदुसऱ्यांना मदत करुन विकास करायला हवा. एक-दुसऱ्यांशी भांडून आपला वेळा व संसाधन वाया घालवू नये. आमचे भारतासोबत तीन युद्ध झाले आहे. या तीन युद्धानंतर पाकिस्तानात गरीबी व बेरोजगारी आली. आम्हाला आमचा धडा मिळाला आहे. आता आम्हाला शांतता हवी आहे. आमचे प्रश्न सोडवायचे आहे.
وزیراعظم شہباز شریف کا العربیہ ٹی وی کے ساتھ خصوصی انٹرویو۔۔۔ https://t.co/Cm5BOeQSJr
हे सुद्धा वाचा— PML(N) (@pmln_org) January 16, 2023
मोदींना द्यायचा संदेश शाहबाज म्हणाले की, आम्हाला गरिबी संपवायची आहे. देशात समृद्धी आणायची आहे. आपल्या लोकांना चांगले शिक्षण, उत्तम आरोग्य सुविधा आणि रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. आम्हाला आमची संसाधने बॉम्ब आणि दारूगोळ्यावर वाया घालवायची नाहीत. हाच संदेश मला पंतप्रधान मोदींना द्यायचा आहे. आमच्याकडे अभियंते, डॉक्टर आणि कुशल मजूर आहेत. मला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगायचे आहे की, या सर्व गोष्टींचा उपयोग देशाच्या समृद्धीसाठी करायचा आहे, जेणेकरून या प्रदेशात शांतता प्रस्थापित होईल जेणेकरून दोन्ही देशांची प्रगती होईल.
सौदी अरेबियाबद्दल शाहबाज म्हणाले की, UAE आमचा मित्रराष्ट्र आहे आणि पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये शतकानुशतके मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पाकिस्तान अस्तित्वात येण्यापूर्वीपासून लाखो मुस्लिमांचे सौदी अरेबियाशी बंधुत्वाचे संबंध आहेत आणि ते मक्का आणि मदिना यात्रेला जात आहेत.भारत आणि पाकिस्तानला एकत्र आणण्यासाठी UAE महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे ते म्हणाले.
काश्मीरवरुन पुन्हा बडबडले पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज पुन्हा एकदा काश्मीरचा उल्लेख करत म्हणाले की, मला पंतप्रधान मोदींना सांगायचे आहे की, आम्हाला शांततेत जगायचे आहे. पण काश्मीरमध्ये जे चालले आहे ते थांबवले पाहिजे. मानवी हक्कांचे उल्लंघन थांबले पाहिजे. वेळी माझा मोदींना संदेश आहे की आपण वाटाघाटीच्या टेबलावर बसून काश्मीरसारख्या ज्वलंत मुद्द्यावर गंभीर चर्चा केली पाहिजे. आपले दोन्ही देश अण्वस्त्रसंपन्न राष्ट्र आहेत. यामुळे जर युद्ध झाले तर जे होईल ते सांगण्यासाठी कोणीही नसेल.