Pakistan Political Crisis : पाकिस्तानमध्ये सत्तेचा ‘एप्रिल फुल’, याच महिन्यात सर्वाधिक सरकारे कोसळली; पाहा विशेष रिपोर्ट
Pakistan Political Crisis : पाकिस्तानात पुन्हा एकदा लोकांनी निवडून दिलेलं सरकार अल्प काळात कोसळलं आहे. विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आणि तो जिंकल्याने इम्रान खान यांना सत्तेतून पायउतार व्हाव लागलं आहे.
लाहोर: पाकिस्तानात (pakistan) पुन्हा एकदा लोकांनी निवडून दिलेलं सरकार अल्प काळात कोसळलं आहे. विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव (no trust vote) आणला आणि तो जिंकल्याने इम्रान खान (imran khan) यांना सत्तेतून पायउतार व्हाव लागलं आहे. अविश्वास ठराव जिंकता न आल्याने इम्रान खान यांचं पंतप्रधानपद गेलं आहे. सत्ता जाणार असल्याची कुणकुण लागल्याने इम्रान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी त्यांचा ट्विटरवरचा बायोही बदलला होता. त्यामुळे पाकिस्तानला नवा पंतप्रधान मिळणार आहे. पाकिस्तानच्या 75 वर्षाच्या इतिहासात 23 वा पंतप्रधान मिळणार आहे. मात्र, या निमित्ताने एक इंटरेस्टिंग गोष्ट समोर आली आहे. एप्रिल महिना हा पाकिस्तानातील राजकारण्यासाठी अनलकी मानला जात आहे. पाकिस्तानात इम्रान खान यांची सत्ताही एप्रिलमध्येच गेली आहे. त्यामुळे एप्रिल महिना आणि पाकिस्तानातील सत्ता जाणं याची चर्चा चांगलीच रंगली आहे.
एप्रिल आणि ऑक्टोबर अनलकी
ऑक्टोबरनंतर एप्रिल महिनाही पाकिस्तानातील राजकारणात अनलकी मानला जात आहे. पाकिस्तानच्या 75 वर्षाच्या इतिहासात कोणत्याही पंतप्रधानांनी कार्यकाळ पूर्ण केला नाही. 22 पैकी 4 पंतप्रधानांना ऑक्टोबर आणि एप्रिल महिन्यातच आपलं पद गमवावं लागलं आहे. इम्रान खान यांच्या सत्तेतून पायउतार होण्यापूर्वी ऑक्टोबर महिना अनलकी मानला जात होता. कारण त्या महिन्यात चार पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे. तर एप्रिल महिन्यात तीन पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला आहे. आता इम्रान खान यांनाही एप्रिलमध्येच पंतप्रधानपद सोडावं लागलं आहे.
जानेवारी-फेब्रुवारी लाभदायक
मात्र, जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने पाकिस्तानच्या पंतप्रधानांसाठी अत्यंत लाभदायक ठरले आहेत. या दोन महिन्यात एकाही पंतप्रधानांनी राजीनामा दिला नाही. त्यामुळे हे दोन महिने पाकिस्तानच्या राजकारणासाठी अत्यंत चांगले ठरले आहेत. फेब्रुवारीत एका पंतप्रधानाचा शपथविधी झाला होता. 17 फेब्रुवारी 1997मध्ये नवाज शरीफ यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली होती. ऑगस्ट महिनाही असाच लाभदायक ठरला आहे. या महिन्यात 22 पैकी सहा नेत्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. स्वत: इम्रान खान यांनी ऑगस्ट 2018मध्ये पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती.
संबंधित बातम्या:
Pakistan Political Crisis : इम्रान खान यांच्या अटकेची शक्यता ! पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाचे आदेश