Pakistan Political Crisis : पाकिस्तानाचे PM इमरान खान राजकीय संकटात,अविश्वास ठरावासाठी 4 नेत्यांची आघाडी, आणीबाणी लागणार?
पाकिस्तानातील (Pakistan) इमरान खान (Imran Khan) सरकारवर राजकीय संकट निर्माण झालंय. इमरान खान यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.
लाहोर : पाकिस्तानातील (Pakistan) इमरान खान (Imran Khan) सरकारवर राजकीय संकट निर्माण झालंय. इमरान खान यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. 25 मार्चला अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे. इमरान खान यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव आणला आहे. तर, इमरान खान यांनी विरोधकांनी पैशाचा वापर केला असल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तनाच्या संसदेत 25 मार्चला होत असलेल्या मतदानावेळी इमरान खान यांना त्यांचं सरकार आणि पंतप्रधानपद वाचवायचं असल्यास 172 मतांची गरज आहे. पाकिस्तानच्या संसदेची सदस्य संख्या 342 इतकी आहे. इमरान खान यांच्या विरोधात चार प्रमुख नेत्यांनी आघाडी उघडली आहे. इमरान खान एखाद्यावेळी आणीबाणी (Emergency) देखील लागू करुन सरकार वाचवू शकतात, अशी शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
इमरान खान यांना 4 नेत्यांचं आव्हान
बिलावल भुट्टो
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे बिलावल भुट्टो यांनी इमरान खान यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला नाही तर ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनची बैठक होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतलीय. पाकिस्ताना आयओसीची बैठक 22-23 मार्चला होणार आहे. भुट्टो सभागृहातील सभापती असद कैसर यांच्यावर संविधानाचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
शहबाज शरीफ
पाकिस्तानातील विरोधी पक्षाचे प्रमुख नेते म्हणून शहबाज शरीफ यांची ओळख आहे. पाकिस्तान मुस्लीम लीग नवाज या पक्षाचे ते खासदार आहेत. नवाज शरीफ यांचे ते छोटे भाऊ आहेत. शहबाज शरीफ यांनी संविधानिक मार्गानं इमरान खान यांना पदावरुन हटवलं नाही तर पाकिस्तनाचं भविष्य संकटात असल्यात ते म्हणाले. इमरान खान यांचं सरकार पडल्यास शहबाज शरीफ यांना अंतरिम पंतप्रधान केलं जाऊ शकतं.
फजल उर रहमान
पाकिस्तान मुव्हमेंट पार्टी आणि जमियत उलेमा ए फजल या पक्षाचे फजल उर रहमान हे नेते आहेत. इमरान खान यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणणाऱ्यामध्ये त्यांचा समावेश आहे.
अल्ताफ हुसेन
पाकिस्तानातील राजकीय संकटात मुत्तहिदा कैमी मुव्हमेंट पाकिस्तानचे प्रमुख अल्ताफ हुसेन यांचं नाव देखील चर्चेत आहे. इमरान खान यांच्या सरकारला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. इमरान खान यांच्या विरोधात बिलावल भुट्टो यांनी अल्ताफ हुसेन यांच्याशी चर्चा सुरु आहे. एमक्यूएमपीचे संयोजक खालिद मकबूल सिद्दीकी यांनी इमरान खान अधिक वेळ सत्तेत राहणार नसल्याचं जिओ न्यूजसोबत बोलताना सांगितलं होतं.
24 खासदारांचं बंड
पाकिस्तानच्या संसदेतील सदस्य संखा 342 इतकी आहे. बहुमतासाठी लागणाऱ्या मॅजिक फिगरची संख्या 172 आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत इमरान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक पार्टीचे 155 खासदार निवडून आले होते. सहा इतर पक्षांच्या पाठिंब्यानं इमरान खान यांनी सरकार स्थापन केलं होतं. आता इमरान खान यांच्या पक्षाच्या 24 आमदारांनी बंड केलं आहे. इमरान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठरावावेळी ते ठरावाच्या बाजूनं आणि इमरान खान यांच्या विरोधात मतदान करण्याची शक्यता आहे. इमरान खान यांच्याकडून त्या 24 खासदारांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. इमरान सरकार पाकिस्तानच्या संविधानाच्या कलम 63 (A) नुसार बंडखोर खासदारांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या:
China Plane Crash : चीनचं बोईंग 737 विमान क्रॅश, जंगलात विमान जळून खाक, 133 प्रवाशांचं काय झालं?