चीन-अमेरिका संघर्षचा पाकिस्तानला झटका, शाहीन-3 प्रोजेक्टवर पाणी…तेल ही गेले अन् तूप ही गेले…

shaheen 3 missile range: अमेरिकेकडून देण्यात आलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, चीन संशोधन संस्थेवर निर्बंध आणण्यात आले आहे. या संस्था पाकिस्तानला क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी लागणारी उपकरणे निर्यात करत होत होती.

चीन-अमेरिका संघर्षचा पाकिस्तानला झटका, शाहीन-3 प्रोजेक्टवर पाणी...तेल ही गेले अन् तूप ही गेले...
Shaheen-3 Missile
Follow us
| Updated on: Sep 17, 2024 | 9:56 AM

Shaheen-3 Missile: चीन आणि अमेरिकेत संघर्ष कायम आहे. यामुळे अमेरिकेने चीनविरोधात कठोर पावले उचलली आहेत. आता अमेरिकेने पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला झटका दिला आहे. पाकिस्तानी क्षेपणास्त्र प्रकल्पाशी संबंधित चीन कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लादले आहे. अमेरिकन क्षेपणास्त्र तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्यानुसार हे पाऊल उचलले आहे. यामुळे पाकिस्तानचा शाहीन-3 क्षेपणास्त्र प्रकल्पावर पाणी फिरले आहे. भारताच्या सर्व भागांत क्षेपणास्त्र पोहचू शकणारे तंत्रज्ञान विकसित करण्यावर पाकिस्तानचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.

अमेरिकेकडून देण्यात आलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, चीन संशोधन संस्थेवर निर्बंध आणण्यात आले आहे. या संस्था पाकिस्तानला क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी लागणारी उपकरणे निर्यात करत होत होती. चीनी संस्‍था पाकिस्‍तानच्या शाहीन-3 क्षेपणास्त्र, अबाबील सिस्‍टम आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रासाठी रॉकेट मोटर टेस्टिंग देत होते. पाकिस्तान शाहीण क्षेपणास्त्राचा 2750 किमी टप्पा असल्याचा दाव करत होता. हे क्षेपणास्त्र भारताच्या कोणत्याही टप्प्यात जाऊ शकतो, असे पाकिस्तान सांगत होता. परंतु आता पाकिस्तानचा हा प्रकल्पच गुंडळला जाणार आहे.

अमेरिकेकडून स्पष्टीकरण

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितले की, पाकिस्तानचे राष्ट्रीय विकास संकुल आणि बीजिंगच्या ऑटोमेशन फॉर मशीन बिल्डिंग संशोधन संस्थेमध्ये क्षेपणास्त्र विकास करण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी शाहीन-3 हे या मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्राचा विकास केला जाणार होता. पाकिस्तानच्या शस्त्रागारातील हे सर्वात लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. तसेच अबाबिल क्षेपणास्त्र 2200 किमीपर्यंत मारा करू शकते आणि त्याचे तीन टप्पे आहेत. त्यामुळे आता अमेरिकेने क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मर्यादेत चीन आणि पाकिस्तानच्या अनेक कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत.

हे सुद्धा वाचा

चीन, पाकिस्तानकडून निषेध

पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र विकासाशी संबंधित चिनी संस्थांवर अमेरिकेने निर्बंध लादण्याची ही पहिलीच घटना नाही. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी या कारवाईवर टीका केली आहे. चीनने या निर्बंधांचा निषेध केला आहे. चीनने म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधाराशिवाय एकतर्फी निर्बंध स्वीकारता येणार नाही.

किती धोकादायक आहे शाहीन

पाकिस्तानचे शाहीन-III हे दोन टप्प्याचे क्षेपणास्त्र आहे. मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. ते घन इंधनावर चालते. या क्षेपणास्त्राची पल्ला 2,750 किलोमीटर आहे. ते पारंपारिक आणि अण्वस्त्र दोन्ही वाहून नेऊ शकते. पाकिस्तान लष्कराच्या शस्त्रागारातील हे सर्वात लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.